ASI Rajesh Kumar Heart Attack Death Viral Video: हल्ली हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हसता खेळता अनेकांना हार्ट अटॅकने जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे आरोग्याचा गंभीर मुद्दा उपस्थित होत आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्ट (Tis Hazari Court) परिसरात अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ड्युटीवर असलेले दिल्ली पोलीस सहायक उपनिरीक्षक (ASI) राजेश कुमार यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
कोर्ट परिसरात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या तीस हजारी कोर्टामध्ये पोलीस सहायक उपनिरीक्षक राजेश कुमार यांचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी घडल्याचे सांगितले जात आहे. एएसआय राजेश कुमार कोर्ट परिसरात आपल्या कामावर हजर होते. ही संपूर्ण घटना कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ते फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृत एएसआय राजेश कुमार पूर्णपणे सुस्थितीत दिसत होते. कोर्ट परिसरात येताच त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याशी हस्तांदोलन केले. यानंतर ते जसे एस्केलेटरच्या (Escalator) दिशेने पुढे सरकले, तसे अचानक जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. जवळच उपस्थित असलेल्या अन्य पोलीस कर्मचारी आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कोर्ट परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, ही धक्कादायक घटना संपूर्ण कोर्ट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर फुटेज व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.