Video: हाताने कुकर उघडलं नाही, महिलेनं लावला दिमाग! केलं असं काही..सोशल मीडियावर बायकांनी केलं भरभरून कौतुक!

Woman Opens Cooker Jugaad Video : कुकर उघडणे हीसुद्धा एक कला आहे... ज्यात सगळेच पटाईत नसतात. अनेक लोक वयाच्या एका टप्प्यानंतरच या कलेत पारंगत होतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने युजर्सना थक्क केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman Desi Jugaad video
मुंबई:

Woman Opens Cooker Jugaad Video : कुकर उघडणे हीसुद्धा एक कला आहे... ज्यात सगळेच पटाईत नसतात. अनेक लोक वयाच्या एका टप्प्यानंतरच या कलेत पारंगत होतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने युजर्सना थक्क केले आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक महिला कुकर उघडण्यासाठी असा उपाय करताना दिसते, जो तुम्ही कदाचित चुकूनही करून पाहिला नसेल. हा व्हिडिओ पाहून बहुतांश युजर्स म्हणत आहेत की, कुकरमध्ये असे काय बनवले आहे, जे उघडतच नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला कुकर उघडण्यासाठी झगडताना दिसते. ती सर्वप्रथम कुकरच्या झाकणावर एक कापड ठेवते, मग त्यावर दोन्ही पाय ठेवून उभी राहते. पण तरीही कुकर उघडत नाही. त्यानंतर ती झाकणाचा हँडल पकडून ते फिरवते. खूप कसरत केल्यानंतर ती पुन्हा झाकणावर चढते. इतकेच नाही, ती उडीही मारते, पण तरीही झाकण उघडत नाही.

नक्की वाचा >> ना फॅमिली, ना पत्नी..'या' अभिनेत्रीच्या एका धमकीला घाबरले होते धर्मेंद्र, दारू पिणंच बंद केलं होतं

महिलेच्या व्हायरल व्हिडीओला 27.3 मिलियन पेज व्ह्यूज

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @kamsaryarik या हँडलवरून 31 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते – “किती छानपणे जेवण बनवलंय माझ्या मित्राने.” ही पोस्ट बातमी लिहीपर्यंत तब्बल 27.3 मिलियन व्ह्यूज आणि 91 हजार लाइक्स मिळवून बसली आहे. तर साडेतीन हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.

Advertisement

नक्की वाचा >> 900 सिनेमात काम करणारा सुपरस्टार, 85 अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, 1 वर्षात 39 फिल्मची ऑफर, फोटोत ओळखा पाहू

या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहिले – “थोडी कदर करा अन्नधान्याची!” दुसऱ्याने म्हटले – “म्हणूनच शिक्षण गरजेचे आहे.” तर काही युजर्सनी गंभीरतेने लिहिले की, “हे खूप धोकादायक आहे... तुमचे नशीब चांगले की कुकर फुटला नाही.” काही युजर्सनी विचारले – “कुकर उघडणे इतके आव्हानात्मक का असते?” तसेच, असे कधी तुमच्यासोबतही झाले आहे का, जेव्हा कुकर उघडण्यासाठी तुम्हाला खूप कसरत करावी लागली? कमेंटमध्ये लिहा.