Aniruddhacharya Viral Video : कथावाचक अनिरुद्धाचार्यांना त्यांचे तमाम भक्त अनेक प्रश्न विचारतात. पण एका भक्ताने असा प्रश्न विचारला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सिगारेटच्या लायटरने धूप-दिवा पेटवता येतो का?असा प्रश्न एका भक्ताने विचारला होता. यावर अनिरुद्धाचार्य यांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अनिरुद्धाचार्य नेहमी भक्तांशी चर्चा करत असतात. त्यानंतर त्यांच्या चर्चेचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतो. यावेळी असंच काहीसं घडलं आहे. एका भक्ताने त्यांना एक आगळावेगळा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी बिंधास्तपणे या प्रश्नाचं उत्तर दिलं. सोशल मीडियावर त्यांना 'पूकी बाबा'अशाही नावाने ओळखलं जातं.
लायटरने धूप-दिवा पेटवू शकतो का?
अनिरुद्धाचार्यांच्या पंडालमध्ये एक भक्ताने त्यांना विचारलं की, लायटरने धूप-दिवा पेटवू शकतो का? यावर त्यांनी थेट उत्तर देत म्हटलं, मग कशाने पेटवणार? दिवा काय ज्वालामुखीने पेटवणार? असा उलट प्रश्न करत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर तो भक्त पुन्हा विचारतो, लायटरने तर सिगारेटही पेटवलेली असेल..यावर अनिरुद्धाचार्य म्हणतात, कोणतीही गोष्ट पेटवण्याचं काम लायटरचं आहे.
मग सिगारेट पेटवा, जंगल पेटवा किंवा मृतदेह पेटवा. त्याचं काम पेटवणं आहे. अग्नी कधीच अशुद्ध नसते. अनिरुद्धाचार्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.