Baby Elephant Viral Video: मदतीनंतर कृतज्ञता! हत्तीच्या पिल्लाने JCBचे 'असे' मानले आभार; सुंदर VIDEO पाहाच

Chhattisgarh Baby Elephant Cute Video: गावकरी धाडसाने खड्ड्याजवळ गेले आणि जेसीबी मशीनच्या मदतीने माती बाजूला केली ज्यामुळे हत्तीच्या पिल्लाला सहज बाहेर पडता आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chattisgarh baby Elephant Cute Video: प्राणीमात्रांना केलेली मदत, त्यांच्यावर दाखवलेली दया ते कधीच विसरत नाही असं म्हणतात. म्हणूनच घरात पाळलेला कुत्रा, मांजर आपल्या मालकांना तितकाच जीव लावतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका हत्तीच्या पिल्लाला मदत केल्यानंतर त्याने क्युट अंदाजात आभार मानल्याचे दिसत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी चिलकागुडा गावाजवळील चिखलाच्या खड्ड्यात पडलेल्या हत्तीच्या बाळाला वाचवले. लालुंगा आणि घरघोडा वनक्षेत्रात फिरणाऱ्या एका मोठ्या कळपातील हे बाळ त्या भागात पाणी पिऊन आणि आंघोळ करत असताना अडकले होते.

लहान हत्ती बाहेर पडण्यासाठी खूप धडपडत होता. यावेळी त्याचे वेदनादायक रडणे संपूर्ण जंगलात ऐकू येत होते. गावकऱ्यांनी बाळाची दुर्दशा पाहिली तेव्हा त्यांनी वन अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मदतीची वाट न पाहता मोठ्या हत्त्तींचा कळप जवळ असूनही गावकरी धाडसाने खड्ड्याजवळ गेले आणि जेसीबी मशीनच्या मदतीने माती बाजूला केली ज्यामुळे हत्तीच्या पिल्लाला सहज बाहेर पडता आले.

गावकरी आणि वन अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या मदतीने वाचवल्यानंतर अखेर हत्तीचे बाळ मातीच्या खड्ड्यातून बाहेर आले. या मदतीनंतर हत्तीच्या पिल्लाने आपल्या हटके स्टाईलमध्ये आभार मानले. हे  पिल्लू जेसीबी मशीनजवळ गेले आणि त्याला स्पर्श केला त्याला मिठी मारण्याचा प्रयत्नही केला आणि नंतर त्याच्या कळपात सामील झाले. जणू काही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थँक्यू म्हणायलाच हत्तीने ही कृती केली.

Advertisement

हत्तीच्या पिल्लाचा हा सुंदर व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. काही नेटकऱ्यांनी हत्तीला बाहेर काढणाऱ्या गावकऱ्यांचे कौतुक केले आहे तर काही जणांनी प्राणीमात्रांवर दया करा ते तुम्हाला कधीही विसरणार नाहीत, असं म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, पावसाळी अधिवेशनात देणार दणका