'बोनस हवाय! हवा तितका घेऊन जा...' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर Video Viral

Employee Bonus : तुमच्यासमोर तुमच्या कंपनीनं बोनस म्हणून 70 कोटी रुपये ठेवले तर... तुम्ही काय करणार? या कंपनीत हे प्रत्यक्ष घडलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Cash Reward : कंपनीनं 2023 मध्येही बोनस म्हणून मोठी रक्कम कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम वितरीत केली होती.
मुंबई:

आपण जिथं काम करतो त्या ठिकाणी आपल्याला पगारवाढ आणि बोनस मिळावा ही प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. एखादा कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी किती आनंदी आहे, हे मोजण्याचे हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. तुमच्यासमोर तुमच्या कंपनीनं बोनस म्हणून 70 कोटी रुपये ठेवले तर... तुम्ही काय करणार? या कंपनीत हे प्रत्यक्ष घडलं आहे.

चीनमधल्या कंपनीमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर जवळपास 70 कोटी रुपये ठेवले आणि सांगितलं की तुम्ही त्यामधील हवी तेवढी रक्कम घरी घेऊन जाऊ शकता. पण, जितके पैसे तुम्हाला मोजता येतील तितकेच तुम्ही घेऊ शकता.. अशी एक अट ठेवली. चीनमधील हेनान माईनिंग क्रेन कंपनी लिमिटेड कंपनीमधील हा प्रकार आहे. या कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी वर्षाच्या शेवटी बोनस म्हणून 70 कोटी रुपये ठेवले होते. त्यामधील हवी तेवढी रक्कम घरी घेऊ जाण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिला होता. 

(('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 

एका कर्मचाऱ्याला किती रक्कम मिळाली?

कंपनीनं याबाबतचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये कर्मचाऱ्यांसमोर 70 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. एका मोठ्या डेबलावर नोटांची भरपूर बंडलं या टेबलावर मांडण्यात आली आहे. कर्मचारी त्यांना हवे तितके पैसे घेऊन जाताताना दिसत आहेत.

एका कर्मचाऱ्यानं कथितपणे  100,000 युआन म्हणजे जवळपास 12.07 लाख रुपये जमा केलेय 'हेनान कंपनी वर्षाच्या शेवटी लाखो डॉलर्स बोनस देत आहे. कर्मचाऱ्यांनी जितके पैसे मोजता येतील, तितके त्यांनी घेऊन जावेत,' असं या व्हिडिओच्या शेवटी स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  Liang Wenfeng शिक्षकाच्या मुलानं उडवली अमेरिकेची झोप! AI क्रांती करणारा DeepSeek निर्माता कोण आहे? )

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. काही जण कंपनीचं कौतुक करत आहेत. तर काही जणांनी या सर्व पद्धतीवर प्रश्न विचारले आहेत. 'हे खरोखरच प्रेरणादायी आणि शानदार आहे,' असं एका युझरनं म्हंटलं आहे. तर 'ही सर्व सर्कस करण्यापेक्षा तुम्ही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करु शकता,' असं मत अन्य एका युझरनं व्यक्त केलं आहे. 

Advertisement

2023 मध्येही दिला होता बोनस

हेनान माईनिंग क्रेन कंपनी बोनसमुळे यापूर्वी देखील चर्चेत होता. 2023 साली कंपनीनं वार्षिक रात्रीच्या जेवणाच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वितरीत केली होती. 
 

Topics mentioned in this article