"पप्पा माझा बॉयफ्रेंड आहे..", इंटरकास्ट असल्याने 11 वर्षांनी सांगितलं, रडणाऱ्या लेकीला बापाने जे उत्तर दिलं..

रोजच्या धावपळीच्या जीवनात जे काही घडतं किंवा ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्याबाबत मुलं-मुली आपल्या पालकांना या सर्व गोष्टी बिंधास्तपणे सांगतात. पण एका मुलीनं जे केलं आहे, ते ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Father Daughter Bond Video Viral

Father-Daughter Emotional Video : रोजच्या धावपळीच्या जीवनात जे काही घडतं किंवा ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्याबाबत मुलं-मुली आपल्या पालकांना या सर्व गोष्टी बिंधास्तपणे सांगतात. पण एका मुलीनं जे केलं आहे, ते ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बॉयफ्रेंडबद्दल घरच्यांना सांगणे आजही मुलींसाठी तितकं सोपं नाहीय. पण आई-वडिलांची साथ असेल, तर काही मुली न घाबरता त्यांची प्रेमकहाणी कुटुंबीयांना सांगतात. असंच एक प्रकरण इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. मुलगी आणि वडिलांची संवाद दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

मुलीनं तिच्या वडिलांना प्रेमप्रकरणाबाबत काय सांगितलं?

“पप्पा, माझा बॉयफ्रेंड आहे.” एवढी साधी गोष्ट सांगण्यासाठी ज्या मुलीची 11 वर्षे गेली,तिच्या वडिलांनी काही शब्दांतच तिची सगळी भीती आणि घाबरटपणा दूर केला. दोघांचाही संवाद कॅमेराद कैद झाला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. पालक मुलांसाठी किती सपोर्टिव्ह असतात, याचं उत्तम उदाहरण या प्रकरणाच्या माध्यमातून समोर आलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मुलगी रडत असल्याचं पाहायला मिळतं. पण तिचे वडील तिला समजावून सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ते म्हणतात, “काही होणार नाही, काय झालं बेटा, घाबरू नकोस.” ही तर सुरुवात होती..असं म्हणत वडिलांनी त्यांच्या मुलीला धीर दिला.

"बॉयफ्रेंड इंटरकास्ट असल्याने मुलगी घाबरली अन्.."

त्यानंतर मुलगी मनमोकळेपणाने म्हणते की, “सांगायची इच्छा होती पण आता सांगते की पप्पा,माझा बॉयफ्रेंड आहे.” त्यानंतर वडील असं म्हणतात की, “यात घाबरण्यासारखं काय आहे? ही तर आनंदाची गोष्ट आहे.” बॉयफ्रेंड इंटरकास्ट असल्याने मुलगी घाबरली होती. यावर तिचे वडील म्हणतात,“जात-पात काही नसते. प्रत्येक कम्युनिटीमध्ये काही टक्के चांगले आणि काही वाईट लोक असतातच.”मुलीच्या धैर्याची आणि वडिलांच्या स्वभावाचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.हा व्हिडीओ पाहून एका यूजरने म्हटलंय की,“वडिलांचे प्रत्येक शब्द अगदी बरोबर आहेत.”

Advertisement