भिंतीमधून पडत होतं AC चं पाणी, चरणामृत समजून पिण्यासाठी झाली गर्दी, प्रसिद्ध मंदिरातील Video Viral

Banke Bihari Temple Video : हत्तीच्या मूर्तीमधून पडणारं पाणी हे चरणामृत असल्याची भाविकांची श्रद्धा होती. पण, ते प्रत्यक्षात मंदिरातील AC मधून बाहेर पडणारं पाणी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Banke Bihari Temple Video : सश्रद्ध माणसांच्या भावनांशी कशा पद्धतीनं खेळ केला जातो, याचं एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत मंदिराच्या गर्भगृहाजवळच्या भिंतीजवळ भाविकांची मोठी रांग लागली आहे. भिंतीवरील हत्तीच्या मूर्तीमधून पडत असलेलं चरणामृत पिण्यासाठी ही गर्दी जमा झाल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. काही भाविक तर अगदी कप, ग्लास घेऊन हे पाणी त्यामध्ये घेण्याची धडपड करत आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हत्तीच्या मूर्तीमधून पडणारं पाणी हे चरणामृत असल्याची भाविकांची श्रद्धा होती. पण, ते प्रत्यक्षात मंदिरातील AC मधून बाहेर पडणारं पाणी आहे. मंदिरातील रेकॉर्डिंगमध्येही एक व्यक्ती हे पाणी AC चं असल्याचं सांगत आहे. 'दीदी, हे एसीचं पाणी आहे. ठाकूरजींच्या (श्रीकृष्ण) पायाचं पाणी नाही. मंदिरातील पुजाऱ्यानंही हेच सांगितलंय,' असं ती व्यक्ती सांगत आहे. पण, त्यानंतरही त्या ठिकाणची भाविकांची गर्दी कमी झालेली नाही. अनेक जण हे पाणी पिण्याची तसंच आपल्याजवळच्या भांड्यात जमा करण्यासाठी धडपड करत होते.

उत्तर प्रदेशातील मंदिरामधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'शास्त्रीय विचार न करणारं डोकं हे काल्पनिक कथा, अंधविश्वास, आणि दुहीचं जन्मदाता आहे. हा लोकशाहीला धोका आहे,' अशी प्रतिक्रिया एका युझंरनं व्यक्त केली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले, मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य माहिती आहे का? )
 

तर, कुणीही एक सेकंद थांबून हे सर्व का होतंय? याचा विचार का करत नाही? असा प्रश्न दुसऱ्या युझरनं विचारला आहे. एका लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरमं कुलींग आणि एसीमधून बाहेर पडणारं पाण्यातून अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. हे अत्यंत धोकादायक आहे, असा इशारा दिला आहे. 

मंदिर प्रशासनानं या पाण्याबाबतचं स्पष्टीकरण देणारी नोटीस तिथं लावली पाहिजे अशी मागणी अन्य एका युझरनं केली आहे. 

Topics mentioned in this article