Video: तुम्हीही ऑफिसमध्ये 'या' 10 गोष्टींवर गॉसिप करता? आताच सावध व्हा..कॉर्पोरेटमध्ये होईल मोठं नुकसान

नोकरी पेशा असणाऱ्या लोकांचं जगही वेगळचं असतं. इथे कोणी कधी तुमचा मित्र होईल आणि कोणी तुमचा दुश्मन, याचा अंदाज बांधता येणार नाही. ऑफिसमध्ये काही लोक बॉसचे कान भरतात आणि तुमची नोकरी धोक्यात आणतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
Office Politics Viral Video

Office Politics Tips: नोकरी पेशा असणाऱ्या लोकांचं जगही वेगळचं असतं. इथे कोणी कधी तुमचा मित्र होईल आणि कोणी तुमचा दुश्मन, याचा अंदाज बांधता येणार नाही. ऑफिसमध्ये काही लोक बॉसचे कान भरतात आणि तुमची नोकरी धोक्यात आणतात. हैदराबादला राहणारी दीपिका, जी एमेझॉन कंपनीत काम करते. तिने अशा गोष्टींचा खुलासा केला आहे, ज्या अनेक कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की,ऑफिस पॉलिटिक्सपासून वाचायचं असेल तर तुम्ही शांत राहणेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

दीपिकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात मोठी चूक जी लोक अतिउत्साहात करतात, ती म्हणजे त्यांच्या पगाराचा खुलासा..तुमच्या खिशात किती पैसे येतात,हे जेव्हा सर्वांना कळतं, तेव्हापासून स्पर्धा आणि जलसीचा खेळ सुरु होता. याशिवाय घरातील कटकट आणि वैयक्तिक समस्या डेस्कवर आणू नका. जर तुम्ही तुमचं कमजोरी सहकाऱ्यांना सांगाल, तर ते तुम्हाला प्रोफेशनल समजणार नाहीत.ऑफिस काम करण्याची जागा आहे.कोणताही इमोशनल सपोर्ट ग्रुप नाही.

Advertisement

 नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील भीमाशंकर परिसरात घडतायत भयंकर घटना, स्थानिकांसह पर्यटकांची धडधड वाढली

बॉसची बदनामी आणि जॉब स्विचचं प्लॅन महागात पडेल

कॅन्टिनमध्ये बसून बॉसची बदनामी करणं खूप चांगलं वाटत असेल, तर ही सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते.याशिवाय तुम्ही जर नवीन नोकरी शोधत असाल, तर याचा गोंगाट कधीही करू नका. ज्या दिवशी कंपनीला समजेल की, तुम्ही दुसरीकडे संधी शोधत आहात, त्या दिवसापासून तुमची किंमत कमी होईल. तसच जातीवाद, धर्माविषयीच्या प्रकरणांपासून दूर राहणंच चांगलं. कारण यामुळे वादविवाद होतात आणि नात्यात कटूता निर्माण होते. 

नक्की वाचा >> AC Water Benefits: तुम्हीही फेकून देता AC मधून बाहेर पडणारं पाणी? पैसै अन् मेहनतही वाचेल, फक्त 'असा' करा वापर

गॉसिपपासून दूरच राहा

कॉर्पोरेटच्या जगात तुमची नोकरीच तुमची सर्वात मोठी पूंजी आहे. दुसऱ्यांची बदनामी किंवा गॉसिमध्ये तुम्हाला एका अविश्वसनीय व्यक्तींच्या कॅटेगिरीत सामील करतं.दीपिकाचा हा व्हिडीओ त्या सर्वांसाठी आहे, ज्यांचं मन साफ आहे पण त्यांना गॉसिपची सवय आहे.स्मार्ट प्रोफेशनला तेच आहेत, जे कामाच्या गोष्टी सावधपणे करतील. पण तुमच्या जवळच्या गोष्टींबाबत सतर्क राहा. ऑफिसमध्ये सीमारेषा (Boundaries) नश्चित करणं खूप आवश्यक आहे. कामावर फोकस करा आणि वैयक्तिक गोष्टींना ऑफिसच्या बाहेरच ठेवा.