Dog Attack: मॉर्निंग वॉक बेतला जिवावर! पाळीव कुत्र्याचा महिलेच्या मानेवर थेट हल्ला; पाहा थरारक प्रकार, VIDEO

Dog Attack Video: हा हल्ला इतका भयानक होता की कुत्र्याने महिलेला जमिनीवर पाडून अक्षरशः ओरबाडून काढले. या हल्ल्यात महिलेचा चेहरा पूर्णपणे विस्कटला असून तिच्या शरीरावर अनेक खोल जखमा झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dig Attack Video : ही महिला तिच्या घरासमोरून जात असतानाच तिच्यावर हल्ला झाला.
मुंबई:

Dog Attack Video:  कुत्रे पाळण्याचा छंद अनेकदा जीवावर बेतू शकतो, याचा एक अत्यंत थरारक अनुभव एका महिलेला आला आहे. सकाळी प्रसन्न वातावरणात घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी पडलेल्या या महिलेवर समोरून आलेल्या एका पाळीव कुत्र्याने असा काही हल्ला चढवला की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. हा हल्ला इतका भयानक होता की कुत्र्याने महिलेला जमिनीवर पाडून अक्षरशः ओरबाडून काढले. या हल्ल्यात महिलेचा चेहरा पूर्णपणे विस्कटला असून तिच्या शरीरावर अनेक खोल जखमा झाल्या आहेत.


नेमकी कुठे घडली ही घटना?

हा भयावह प्रकार कोणत्याही जंगलात घडला नाही. तर  आयटी हब समजल्या जाणाऱ्या बेंगळुरू शहरातील आहे. बेंगळुरूच्या एचएसआर लेआउट (HSR Layout) मधील टीचर्स कॉलनीमध्ये 26 जानेवारी रोजी ही घटना घडली. सकाळी 6:54 वाजता ही महिला तिच्या घरासमोरून जात असतानाच समोरच राहणाऱ्या अमरेश रेड्डी यांच्या पाळीव कुत्र्याने हा थरार घडवला.

(नक्की वाचा : लग्नाला झाले होते फक्त 2 महिने ! पत्नी प्रियकरासोबत पळाली,पती आणि मध्यस्थानं संपवलं आयुष्य )
 

भयंकर सीसीटीव्ही फुटेज समोर

या घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यामध्ये दिसते की, महिला शांतपणे चालत असताना अचानक एक कुत्रा तिच्या दिशेने धावत येतो आणि थेट तिच्या मानेचा लचका तोडण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे महिला जोरात डोक्याच्या बाजूने एका दरवाजावर आदळली. महिलेने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या कुत्र्याची पकड इतकी घट्ट होती की महिलेला हालचाल करणेही कठीण झाले होते.

मदत करायला धावलेल्या तरुणाचीही झाली दैना

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारा एक तरुण तिला वाचवण्यासाठी तातडीने बाहेर आला. त्याने कुत्र्याला महिलेपासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या पिसाळलेल्या कुत्र्याने महिलेला सोडताच आपला मोर्चा त्या तरुणाकडे वळवला आणि त्याच्यावरही हल्ला केला. या हिंस्त्र हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पाळीव कुत्र्यांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Advertisement

मालकावर गुन्हा दाखल आणि महिलेची अवस्था

या हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या चेहऱ्यावर इतके टाके पडले आहेत की तिची ओळख पटणेही कठीण झाले आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने एचएसआर लेआउट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून कुत्र्याच्या मालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पाळीव कुत्र्याला मोकळे सोडणे महिलेच्या जीवावर बेतल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.