Gen Z Girl Viral Video : बंगळुरुत एकटी राहणारी 22 वर्षांची श्रद्धा सैनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.तिने तिच्या महिन्याच्या खर्चाचा खुलासा इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच इंटरनेटवर चर्चांना उधाण आलं आहे. आजची युवा पिढी स्वत:वर खर्च करण्यात आणि स्वत:ला प्राधान्य देण्यात व्यस्त असते, असं लोकांचं म्हणणं आहे.
कुठे कुठे खर्च करते पैसे?
- श्रद्धाने तिच्या महिन्याचा खर्च सविस्तरपणे सांगितला आहे. हा खर्च पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.
- फुलांची खरेदी : महिन्यात 2-3 वेळा, जवळपास 2000 रुपये
- मेंटल हेल्थ थेरेपी : जवळपास 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला
- संडे ब्रंच : प्रत्येक रविवारी बाहेर फिरणं : एकूण 2000 रुपये
- ग्रुमिंग (मसाज, पेडीक्योर) : 5000 रुपये
- नेल अपॉइंटमेंट : 3000 रुपये
- एस्थेटिक आयटम्स : 1000 रुपये
- जर्नल/सेल्फ-रिफ्लेक्शन ट्रल्स : 2000 रुपये
नक्की वाचा >> Pune News : 5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित, सावित्रीबाई फुले विद्यापीठात काय घडलंय? विद्यार्थी रस्त्यावर
का करते एवढा खर्च?
श्रद्धाचं म्हणणं आहे की, मेंटल हेल्थ आणि स्वत:चं आनंद खूप आवश्यक आहे.तिच्या माहितीनुसार,पहिल्या काळात लोक स्वत:वर एवढा खर्च करत नव्हते. पण आता Gen Z लोक त्यांच्या आवश्यकतेनुसार मानसिक शांततेला प्राधान्य देतात.
नक्की वाचा >> Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ, 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू, प्रकरण काय?
लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी सपोर्ट करत म्हटलंय, स्वत:वर खर्च करणं आणि सेल्फ लव्हसाठी प्राधान्य देणं चांगली गोष्ट आहे.काही लोकांनी सवालही उपस्थित केले. 2000 रुपयांचं फूल खरेदी करण्याऐवजी स्वस्तातही मिळू शकता. एका यूजरने म्हटलं, जर सकाळी लवकर मार्केटला गेलात, तर हीच फूलं 200 रुपयांत मिळतील.