मोलकरीण म्हणजेच कामवाल्या बायका हा त्या काम करत असलेल्या घराचा आधार असतात. त्या घरातील स्वयंपाकापासून ते अनेक प्रकारची वेगवेगळी कामं त्या करतात. ही कामं करता-करता मालकाचं घर आणि त्यांच्यात विश्वासाचं नातं तयार होतं. अनेक घरातील अविभाज्य भाग असलेल्या या विश्वासाच्या नात्याला तडा देणारी एक धक्कादायक सत्य उघड झालं आहे. तुम्हाला हे वाचून विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. एका व्यापाऱ्याच्या घरात तब्बल 8 वर्षांपासून काम करणारी मोलकरीण त्यांच्या जेवणात लघवी मिसळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झालं आहे. हे फुटेज उघड होताच त्या व्यापाऱ्याच्या पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित व्यापाऱ्याच्या पत्नीनं पोलीस तक्रीरीमध्ये सांगितलं की, 'त्यांच्या घरामध्ये तब्बल 8 वर्षांपासून रिना ही महिला घरगुती सहाय्यक म्हणून काम करते. ती स्वयंपाकाचं काम करत असे. त्यांच्या घरातील सदस्य बऱ्याच काळापासून लिव्हरच्या आजारानं त्रस्त आहे. डॉक्टरांचे उपचारही झाले, पण काही फायदा झाला नाही.
अस्वच्छता हे त्यांच्या आजाराचे कारण असू शकतं, असं निदान डॉक्टरांनी उपचाराच्या दरम्यान केलं होतं. लघवीसारख्या पदार्थाचं सेवन केलं तर ते हानीकारक ठरु शकतं. त्यामुळे पोटातीस संसर्ग तसंच अतिसार हे आजार होऊ शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
( नक्की वाचा : प्रेयसीशी लग्न करण्यास तयार नव्हता तरुण, घरच्यांनी जबरदस्तीनं करुन दिला 'पकड़ौआ विवाह' )
Video पाहून धक्का
व्यापारी कुटुंबाला संशय आल्यानंतर त्यांनी सोमवारी स्वयंपाकघरात मोबाईल कॅमेरा लावून रेकॉर्डिंग सुरु केलं. त्यांनी रात्री व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं त्यावेळी त्यांना धक्का बसला. सोमवारी रिनानं स्वयंपाक करताना भांड्यात लघवी केली आणि त्यानंतर त्याच भांड्यात रोटी बनवली आणि घरातील सर्वांना वाढली. हा व्हिडिओ पाहाताच पीडित कुटुंबीयांनी पोलिसांकडं धाव घेत कारवाईची मागणी केली. रिनानं केलेल्या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बोलती बंद
पोलिसांनी हा व्हिडिओ पाहाताच आरोपी रिनाला ताब्यात घेतलं. तिनं सुरुवातीला हे अमानवी कृत्य केल्याचा आरोप फेटाळला. पण, पोलिसांनी तिला व्हिडिओ फुटेज दाखवतात तिची बोलती बंद झाली. आठ वर्षांपासून घरात काम करणारी मोलकरीण अशा प्रकारचं कृत्य करेल असा कधी विचारही केला नव्हता, अशी भावना पीडित व्यापाऱ्यानं व्यक्त केली आहे. आम्ही नेहमी तिची काळजी घेत असू. आमच्या घरात यापूर्वी काही वेळा चोरीच्या घटना घडल्या. त्यावेळी देखील आम्ही तिच्यावर कधी संशय घेतला नाही, असं त्यांनी सांगितलं.