School Teacher Marriage Offer Video Viral : लग्नासाठी मुलांना नोकरीची गरज असते. जी मुलं नोकरी करत नाहीत आणि बेरोजगार असतात,त्यांचं लग्न जुळणं सध्याच्या घडीला कठीण बनलं आहे. पण जे मुलं मुली लव्ह मॅरेज करतात, ते अशा गोष्टींना अपवादही असू शकतात.कारण खरं प्रेम केल्यावर काही यंगस्टर्स नोकरी धंद्याचा विचार न करत थेट घरातून पळून जातात.पण ज्या मुलांकडे नोकरी नाही, त्यांचं काय?असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. पण अशा अविवाहित आणि बेरोजगार मुलांसाठी एक सरकारी शिक्षिकेनं जबरदस्त व्हिडीओ बनवून लग्नाची ऑफरच ठेवली आहे. पण त्या मुलीनं यासाठी एक अट सुद्धा ठेवली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सने भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
माझे नाव प्रीती आहे, पण मला..
एका मुलीला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली आहे. या मुलीला असा मुलगा हवा आहे, ज्याच्याकडे नोकरी नसेल तरी चालेल. कारण तिने तिचं भविष्य सुरक्षित केलं आहे, असं तिचं म्हणणं आहे.सरकारी शिक्षिका झालेल्या या मुलीनं व्हिडीओत असं म्हटलं आहे की,“माझे नाव प्रीती आहे.मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.गुड न्यूज अशी आहे की, मी तुमच्यापैकीच एखाद्याची होणारी बायको आहे. म्हणजे मी सरकारी नोकरी करणार आहे.सरकारी शाळेत TGT टीचरच्या पोस्टवर मी काम करते. मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही आरामात काम करा,तुम्हाला जे करायचे आहे ते करा. कारण मी माझं भविष्य सुरक्षित केलं आहे.
इथे पाहा शिक्षिकेचा भन्नाट व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून एका यूजरने म्हटलंय की,"भावा,ही आता माझी पत्नी आहे.कृपया कोणी दुसरा प्रयत्न करू नका.” दुसऱ्या यूजरने म्हटलंय की,“पण २०२६ मध्ये तर जग संपणार आहे.” तिसरा आणि खूपच पझेसिव्ह युजर फिल्मी स्टाईलमध्ये म्हणतो, “सर्वात आधी त्याचा मृतदेह निघेल ज्याच्या डोक्यावर बाशिंग असेल." अन्य एका यूजरने असंही विचारलं की, तुझा प्रियकर आहे तरी कोण?,तसच चौथा यूजर म्हणतो, तू ड्रममध्ये तर नाही टाकणार ना..असं तर नाही ना की तू फिल्डिंग सेट करतेय..आणखी एकना यूजरने म्हटलं, ज्याला सरकारी नोकरी करणारी मुलगी मिळेल, तो नक्कीच नशिबवान असेल.