काळ आला होता पण... वेगानं वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये बुडणाऱ्या तरुणाला देवदूतानं वाचवलं! पाहा Video

Haridwar Ganga Viral Video: गंगेच्या जोरदार प्रवाहात आंघोळ करत असताना अचानक या तरुणाचे संतुलन बिघडले आणि तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागला.

जाहिरात
Read Time: 2 mins
हरिद्वारमधील 'हर की पौडी' येथे गंगेत बुडणाऱ्या तरुणाच्या बचाव कार्याचा व्हिडिओ
मुंबई:

Haridwar Ganga Viral Video: उत्तराखंडमधल्या हरिद्वारमध्ये गंगा नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो. इथं गंगा स्नान करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागते. कारण,  थोडीशीही चूक झाल्यास पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची भीती असते. अशा परिस्थितीत भाविकांना वाचवण्यासाठी 'हर की पौडी' येथील पुलांवर जाड लोखंडी साखळ्या बांधण्यात आल्या आहेत. जेणेकरून जर कोणी गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहू लागले, तर ती साखळी पकडून स्वतःला वाचवू शकेल.

शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधून आलेल्या एका तरुणासोबत असेच काही घडले. गंगेच्या जोरदार प्रवाहात आंघोळ करत असताना अचानक या तरुणाचे संतुलन बिघडले आणि तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागला. मात्र, पुढच्याच पुलावर त्याने लोखंडी जाड साखळी पकडली. काही वेळ तो तरुण त्याच स्थितीत प्रवाहाच्या मध्यभागी लटकलेला होता. त्याचवेळी आपत्ती निवारण दलाचे जवान देवदूत बनून त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला वाचवले.

या संपूर्ण बचाव कार्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, तसेच या घटनेशी संबंधित अनेक फोटो प्रसिद्ध झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी निर्जला एकादशीच्या निमित्ताने गंगा स्नानासाठी अनेक भाविक हरिद्वारला पोहोचले होते. यामध्ये जम्मू-काश्मीरमधून आलेला एक तरुणही होता.

जम्मू-काश्मीरमधून आलेला विशाल नावाचा तरुण गंगेत पोहत असताना अचानक गंगेच्या जोरदार लाटांमध्ये सापडला. त्यानंतर तो जोरदार प्रवाहात बुडू लागला. सुदैवाने, हाथी पुलाजवळ असलेल्या साखळ्यांना त्याने पकडले. यानंतर हरिद्वारच्या आपत्ती निवारण दलाच्या 40 व्या बटालियन पीएससीच्या पथकाने तत्परता दाखवत त्याची सुटका केली.

Advertisement

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
 

त्यांनी विशालला सुरक्षितपणे गंगेतून बाहेर काढण्यात आले. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की जम्मू-काश्मीरमधून गंगा स्नानासाठी आलेला विशाल नावाचा प्रवासी कसा साखळी पकडून लटकलेला आहे. त्यानंतर तत्काळ स्पीड बोटने पोहोचलेल्या आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी त्याला वाचवले.

Topics mentioned in this article