Instagram चं वेड, Reel करताना 22 वर्षीय तरुणाचा भयंकर शेवट; थरकाप उडवणारा Video आला समोर

अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
या अपघातात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला
मंडी:

Shocking Video : हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये बाइक स्टंट करीत असताना एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री उशीरा झाला. मृत तरुणाचं नाव अनिकेत असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत सोशल मीडियावर रील्स बनवित होता. अपघातावेळीही तो रील्सचं बनवित होता. या प्रकरणात पोलिसांनी एका व्हिडिओग्राफरला आरोपी ठरवलं आहे. त्याच्यावर अनिकेतला स्टंट करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. मोबाइल आणि कॅमेऱ्यातील फुटेज ताब्यात घेण्यात आली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

मंडी जिल्ह्यातील बल्ह परिसरातील नगचला निवासी अभिकेत रात्री उशीरा साधारण 1 वाजता किरतपूर मनाली फोरलेनच्या मलोरी टनलजवळ स्टंट करीत होता. त्यादरम्यान बाइकवरील नियंत्रण गमावल्यामुळे मोठा अपघात घडला. या अपघातात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. 

अनिकेत बीटेकचं शिक्षण घेत होता. तो इन्स्टाग्रामवर बराच सक्रिय होता. तो नियमितपणे रील्स शेअर करीत होता. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार, स्टंट करीत असताना अनिकेतचं बाईकवरील संतुलन बिघडल्याचं सांगितलं जात आहे. तो स्पीडमध्ये होता. बाईकवरील नियंत्रण गेल्याने तो जमिनीवर पडला. यामुळे त्याची मान मोडल्याचं सांगितलं जात आहे.