Home loan repayment tips : घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण त्याचसोबत येणारं गृहकर्ज (Home Loan) म्हणजे अनेकांसाठी मोठा मानसिक आणि आर्थिक ताण असतो. मात्र, दिल्लीतील एका सॉफ्टवेअर इंजिनियरनं (Software Engineer) हे कर्ज केवळ 6 वर्षांत पूर्णपणे फेडून एक मोठा आदर्श उभा केला आहे.
मुळचा दिल्लीकर आणि सध्या जर्मनीमध्ये (Germany) काम करत असलेल्या या इंजिनियरनं त्यांचं 53 लाख रुपये (Rupees) गृहकर्ज अवघ्या 6 वर्षांत संपवलं आहे. त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये हे कर्ज घेतलं होतं आणि नोव्हेंबर 2025 मध्ये ते पूर्णपणे चुकतं केलं. रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली ही मोठी उपलब्धी (Achievement) शेअर करताना त्यांनी कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठीच्या 6 महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्हालाही नक्कीच फायदेशीर ठरतील.
1. मानसिक दबाव असतो खरी कसोटी
इंजिनियरनं सर्वात महत्त्वाचा मुद्दा नमूद केला आहे तो म्हणजे मानसिक दबाव. तो (इंजिनियर) म्हणतो, "तुम्ही जास्त विचार करत असाल किंवा तुम्हाला काळजी करण्याची सवय असेल, तर गृहकर्ज घेऊ नका." ईएमआयचा (EMI) ताण दर महिन्याला जाणवतो आणि जर आर्थिक नियोजन (Financial Planning) पक्कं नसेल, तर हा बोजा अधिक वाढू शकतो. त्यामुळे कर्जाचा विचार करण्यापूर्वी मानसिकरित्या तयार असणं खूप गरजेचं आहे.
( नक्की वाचा : Traffic Police: काय सांगता काय! ''हेल्मेट' नव्हतं म्हणून तरुणाला 21 लाखांचा दंड, कोणती चूक नडली? )
2. वेळेवर आणि योग्य नियोजन महत्त्वाचं
कर्ज घेण्यापूर्वी योग्य वेळेवर योजना (Planning) बनवणं हा दुसरा धडा त्यांनी दिला आहे. त्यांनी सांगितलं की, "कर्ज घेण्याआधी मित्र, कुटुंब किंवा आर्थिक तज्ज्ञांकडून (Financial Experts) सल्ला घेणं आवश्यक आहे." कर्जासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक गणिते आधीच समजून घेतल्यास, भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे कर्जाचे स्वरूप, कालावधी आणि व्याजदर यांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
3. परदेशातील नोकरीमुळे मोठी मदत
आपलं कर्ज लवकर फेडण्याचं एक मोठं कारण त्यांनी परदेशातील नोकरी हे सांगितलं आहे. ते म्हणाले, "मी 2021 मध्ये जर्मनीला गेलो, ज्यामुळे माझी आमदनी (Income) वाढली." उत्पन्न वाढल्यानं बचत (Savings) वाढवणं सोपं झालं आणि याच बचतीनं त्यांना कर्जावरील व्याज (Interest) वाचवण्यास मदत केली. मोठी कमाई आणि जास्त बचत यामुळे मुदतपूर्व कर्जफेडीचा मार्ग सोपा झाला.
( नक्की वाचा : Viral News: भाच्याच्या लग्नात मामांनी दिली 2 कोटींचा मायरा, 1.1 कोटी कॅश , 31 तोळं सोनं, वाचा काय आहे पद्धत? )
4. घर फक्त 'स्वप्न' नाही, एक जबाबदारीही
घराला केवळ भावनिक स्वप्न (Emotional Dream) न मानता, ती एक जबाबदारी (Responsibility) असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. घर घेतल्यानं आनंद होतो खरा, पण त्याचसोबत देखभाल (Maintenance) आणि इतर खर्चही येतात. त्यांनी या पोस्टमध्ये लिहलं आहे, "घराचा मालक असणं म्हणजे त्याच्या प्रत्येक समस्येचा मालक असणं आहे." त्यामुळे केवळ ईएमआयचाच नाही, तर घराच्या देखभाल खर्चाचाही विचार नियोजनात असावा.
5. नेटवर्थ (Net Worth) आणि लिक्विडिटी (Liquidity) मधील फरक
या इंजिनियरनं एक महत्त्वाचा आर्थिक धडा दिला. त्यांनी स्पष्ट केलं की, "माझं घर आता 1 कोटी रुपये (Rupees) किमतीचं आहे, पण माझं बँक अकाउंट जवळपास रिकामं आहे." याचा अर्थ, कागदोपत्री (On Paper) श्रीमंत दिसणं आणि हातात खरा पैसा (Liquid Cash) असणं, यात फरक आहे. तो म्हणतो, "योग्य आर्थिक नियोजन (Financial Planning) महत्त्वाचं आहे, अन्यथा तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी जास्त वेळ लावशील." मालमत्ता (Assets) आणि रोकड (Cash) यांच्यात योग्य संतुलन राखणं महत्त्वाचं आहे.
I Paid Off My ₹53 Lakh Home Loan in 6 Years — Here's What I Learned
byu/DJAMAKUSA indelhi
6. मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड (Pre-Payment) करा
कर्ज लवकर फेडण्यामध्ये मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड करण्याचा मोठा वाटा असतो. वाढीव उत्पन्नाचा (Increased Income) उपयोग करून त्यांनी दरवर्षी कर्जाचा काही भाग मुख्य रकमेतून (Principal Amount) परत केला. यामुळे कर्जावरील एकूण व्याज खूप मोठ्या प्रमाणात वाचले आणि कर्ज कमी कालावधीत संपवता आले.
सोशल मीडियावर कौतुक
त्याच्या या पोस्टवर शेकडो युजर्सनी या इनिंनियरला शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं आहे, "EMI च्या तणावातून मुक्त होणं ही सर्वात मोठी जीत आहे, तुम्ही नक्कीच सेलिब्रेशन करा!" दुसऱ्या युजरनं म्हटलं, "अरे मित्रा, तुझी ही कहाणी खूप प्रेरणादायक (Inspirational) आहे, तुझं काम आणि शिस्त दोन्ही यातून दिसतं."