Quitting UPI For 3 Months: आपल्यापैकी अनेकांना पैशांची बचत करायची असते मात्र खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही. सध्या डिजिटल पेमेंटमुळे पैशाची बचत करण्याची सवयच मोडली आहे. मोबाईल काढताच क्षणात होणाऱ्या पेमेंटमुळे पैसा खर्च होत आहे हेच लक्षात येत नाही. याच डीजिटल पेमेंटच्या समस्येवर दिल्लीमधील तरुणीने मार्ग शोधला आहे. दिल्लीमधील या तरुणीने दोन महिने डिजिटल पेमेंटची सवयच बंद केली अन् रोख रक्कमेतून व्यवहार सुरु केले. तिचे ८० टक्के व्यवहार रोख अन् २० टक्के डिजिटल पेमेंटद्वारे होतात. या बदलामुळे तरुणीच्या पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
How to Get Rid of Frogs:पावसामुळे घरात बेडूक येतोय? न मारता 'असे' दूर पळवा; 'या' वासाने होतील गायब!
3 महिने UPI पेमेंट बंद.... काय झाला बदल?
दिल्लीतील एका महिलेने तीन महिने UPI पेमेंट टाळण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तिला तिच्या पैसे खर्च करण्याची चुकीची पद्धत लक्षात आली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, सदफ नावाच्या युझरने सांगितले की, तिने तिच्या दैनंदिन खर्चासाठी रोख रक्कम का वापरायला सुरुवात केली आणि या बदलाचा तिच्या खर्चाच्या सवयींवर कसा परिणाम झाला आहे. तिने सांगितले की, डीजिटल पेमेंट न केल्यामुळे ती प्रत्येक खरेदीबद्दल अधिक जागरूक झाली आणि अनावश्यक खर्च नियंत्रित करण्यास मदत झाली आहे.
आपला अनुभव सांगतान, सदफ म्हणाली की ती गेल्या तीन महिन्यांपासून बहुतेक दैनंदिन व्यवहारांसाठी UPI वापरणे टाळत आहे आणि प्रामुख्याने रोख रकमेवर अवलंबून आहे. यामुळे “सर्वात मोठा फरक हा आहे की मी आता माझ्या खर्चाबद्दल खूप जास्त जागरूक झाले आहे. UPI मध्ये असे होते की नकळतपणे पैसै खर्च करणे सोपे असते. अचानक मला कळतही नाही आणि मी १,००० रुपये खर्च करून बसते. मात्र रोख रकमेमुळे खर्चाशी अधिक घट्ट नाते निर्माण झाले, कारण तिला तिच्या पाकिटातून पैसे बाहेर पडताना प्रत्यक्ष दिसत होते.
सेव्हिंगची सवय लागली
“जेव्हा कधी मी ५०० रुपयांची नोट देते, तेव्हा मला असं वाटतं की माझ्या पाकिटातून पैसे बाहेर पडत आहेत. मी किती खर्च करते आणि माझ्याकडे किती पैसे शिल्लक आहेत हे मला माहीत असतं. त्यामुळेच माझी अविचारीपणे खर्च करण्याची सवय जवळजवळ नाहीशी झाली आहे,” असे ती म्हणाली. तिने पुढे सांगितले की, रोख रक्कम वापरल्यामुळे बजेट बनवणेही सोपे झाले, कारण ॲप सतत तपासण्याऐवजी तिच्याकडे किती पैसे उपलब्ध आहेत हे ती त्वरित पाहू शकत होती.
दरम्यान तिने हे मान्य केले की यूपीआय (UPI) पूर्णपणे सोडून देणे व्यावहारिक नव्हते. अनेकदा कॅश नसणे किंवा दुकानदारांनी सुट्टे पैसै परत करण्यास नकार देणे यांसारख्या परिस्थितीमुळे तिला अनेकदा डिजिटल पेमेंट वापरण्यास भाग पडले. आता ती ८०:२० या दृष्टिकोनाचे पालन करते, ज्यात ती तिच्या खर्चापैकी सुमारे ८० टक्के रक्कम रोखीत ठेवते आणि जेव्हा रोख रक्कम गैरसोयीची असते तेव्हा यूपीआय वापरते.
Baba Vanga: श्रावण महिन्यात भाग्य उजळणार! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल होणार?