Extra Marital Affair Viral Video : विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे संसार प्रपंच मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पंजाबच्या अमृतसरमध्येही अशाच प्रकारचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका पतीने पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पकडल्यानं त्यांचे 15 वर्षांचे वैवाहिक नाते तुटलं आहे. पतीने स्कूटरमध्ये जीपीएस लावल्याने पत्नीच्या अफेअरचा पर्दाफाश झाला. पती रवीनं या प्रकरणाबाबत म्हटलंय की, "त्याची पत्नी दुपारी 3.30 वाजता घरातून बाहेर गेली होती. पण तिला फोन केला तेव्हा ती फोन उचलत नव्हती. पत्नीला जवळपास 15-20 वेळा कॉल करूनही तिने प्रतिसाद दिला नाही".
जीपीएस ट्रॅकर उघडला आणि पती लोकेशनवर पोहोचला
पत्नीच्या अशा वागणुकीमुळे पती रवीचा संशय बळावला. त्यानंतर त्याने पत्नीच्या स्कूटरमध्ये जीपीएस बसवले.जेव्हा पत्नीने फोन उचलला नाही, तेव्हा त्याने जीपीएस ट्रॅकर उघडला आणि तो लोकेशनवर पोहोचला. त्या ठिकाणी पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत होती.असाच प्रकार 2018 मध्येही घडला होता, असं रवीने सांगितलं.त्यावेळी कुटुंबीयांनी बैठक घेतली आणि यावर चर्चा केली. मुलांच्या भविष्याचा विचार करत त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा >> "पप्पा माझा बॉयफ्रेंड आहे..", इंटरकास्ट असल्याने 11 वर्षांनी सांगितलं, रडणाऱ्या लेकीला बापाने जे उत्तर दिलं..
सोशल मीडियावर हा व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पती रवी या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती देताना दिसतो. या व्हिडीओत त्याने दावा केला आहे की, त्याची पत्नी हिमानी आणि त्याचे लग्न 2010 मध्ये झालं होतं. पण आता हे नातं तुटलं आहे.व्हिडीओत रवी रडतानाही दिसत आहे.
नक्की वाचा >> Trending Video सर्वात भयंकर! समुद्राचं पाणी अचानक का होतंय लाल? यामागचं कारण वाचून धक्काच बसेल
एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत यूजर्सने म्हटलंय की, आता पत्नी पतीवर हुंड्याची केस करेल आणि नंतर त्याच्याकडे पोटगीचीही मागणी करेल. या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.