नोएडातील न्यूज चॅनलमध्ये IIT बाबाला मारहाण, Video शेअर करत केले अनेक आरोप

IIT Baba: प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाला मारहाण झाल्याचं वृत्त आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

IIT Baba: प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाला मारहाण झाल्याचं वृत्त आहे. आयआयटी बाबानं सोशल मीडिया नेटवर् इन्स्टा ग्रामवर लाईव्ह येत हा सर्व प्रकार सांगितला आहे. याबाबत मिळालेल्या माहिनुसार IIT बाबा नोएडामधील एका खासगी वृत्त वाहिनीच्या डिबेट कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर गैरवर्तन झालं, तसंच मारहाण झाली. त्यानंतर बाबांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणं आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांना समजावून परत पाढवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणी केली मारहाण?

आयआटी बाबांसोबत मारहाणीचा प्रकार नोएडामधील 126 सेक्टर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. त्यानंतर बाबांनी मारहाणीचा आरोप करत पोलीस स्टेशनच्या समोर धरणं आंदोलन सुरु केलं. डिबेट शोमध्ये सहभागी झालेल्या अन्य लोकांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

IIT बाबानं इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत संपूर्ण घटना सांगितली आहे. मारहाणीनंतर बाबांनी पोलिसांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलंय, 'मला डिबेटसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी काही भगवाधारी व्यक्तींनी न्यूजरुममध्ये माझ्यासोबत झटापट केली. त्यावेळी एका व्यक्तीनं मला काठीनं मारहाण केली. एकानं मला जबरदस्तीनं खोलीत बंद केलं होतं. 

( नक्की वाचा : IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video )

Topics mentioned in this article