जाहिरात

2 लाख महिना! इंटर्नशिपमध्येच करा छप्परफाड कमाई, पदवी किंवा अनुभवाचीही गरज नाही! 'या' पद्धतीनं करा अर्ज

तुम्हाला इंटर्नशिपमध्येच दरमहा 2 लाख रुपये पगार मिळाला तर... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे.

2 लाख महिना! इंटर्नशिपमध्येच करा छप्परफाड कमाई, पदवी किंवा अनुभवाचीही गरज नाही! 'या' पद्धतीनं करा अर्ज
ही इंटर्नशिप रिमोट आहे. त्यामुळे तुम्हाला देशातील कोणत्याही भागातून काम करता येईल.
मुंबई:

महाविद्यालयीन कालखंडात किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या कंपनीत प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम करणे ही सामान्य बाब आहे. या इंटर्नशिपमध्ये अनेक ठिकाणी कोणताही पगार दिला जात नाही. अथवा अगदी अल्प मोबदला मिळतो. पण, तुम्हाला इंटर्नशिपमध्येच दरमहा 2 लाख रुपये पगार मिळाला तर... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. यामधील आणखी एक अविश्वसीय वाटावी अशी गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही औपचारिक पदवीची गरज नाही. अगदी शाळा-कॉलेजचे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करु शकतात.  तसंच यासाठी कंपनीमध्ये येऊन काम करण्याचीही गरज नाही. तुम्ही भारतामधून कुठंही ही नोकरी करु शकता. 

सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये इंटर्नशिप करण्यासाठी 2 लाख रुपये मोबदला मिळणार आहे. ही कोणती नोकरी आहे? त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कुठे मिळणार नोकरी?

Puch AI या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ भाटिया यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक खास इंटर्नशिप संधी जाहीर केली आहे, ज्यात दरमहा 1 लाख ते 2 लाख रुपये स्टायपेंड मिळणार आहे. ही इंटर्नशिप AI इंजिनियर आणि "ग्रोथ मॅजिशियन" या पदांसाठी आहे. विशेष म्हणजे, या पदांसाठी कोणत्याही औपचारिक पदवीची आवश्यकता नाही आणि अगदी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

ही इंटर्नशिप पूर्णपणे रिमोट आहे, त्यामुळे  भारतातील कोणत्याही ठिकाणाहून उमेदवार काम करू शकतात. अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी थेट भाटिया यांच्या पोस्टवर कमेंट करून आपली कौशल्ये आणि हे काम करण्यास तुम्ही का उत्सुक आहात हे सांगणे अपेक्षित आहे.  

( नक्की वाचा : Teaching Fellowship: पदवीधर तरुणांसाठी टीचिंग फेलोशिपची संधी, दरमाह 5000 रुपये मानधनही मिळणार )

या पोस्टमध्ये सिद्धार्थ भाटिया यांनी लिहिले आहे की, "आम्ही तुम्हाला का निवडावे आणि Puch AI मध्ये काम करताना तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी उत्सुक असाल, हे कमेंटमध्ये सांगा (DM करू नका)." त्यांनी रेफरलसाठीही आवाहन केले आहे, "तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला ओळखत असाल तर त्याला टॅग करा.  तो नोकरीवर रुजू झाला, तर तुम्हाला एक आयफोन मिळेल! (एका कमेंटमध्ये फक्त एक टॅग)."

याशिवाय, त्यांनी सांगितले की Puch AI एक हॅकॅथॉन (hackathon) देखील आयोजित करत आहे. त्यात विजेत्यांना थेट इंटर्नशिप मिळेल आणि टॉप 10 मध्ये येणाऱ्यांना संस्थापकांसोबत थेट मुलाखतीची संधी मिळेल.

मोठ्या स्टायपेंडमुळे भाटिया यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे.  अनेक उमेदवारांनी कमेंटमध्येच अर्ज केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची CEO ची रणनिती यशस्वी झाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com