Danny Pandit : फेमस रिल स्टार डॅनी पंडित अडकला विवाहबंधनात, पत्नीसोबत शेअर केला फोटो

Danny Pandit : इंस्टाग्रामवरील फेमस रील स्टार डॅनी पंडितनं लग्न केलंय. डॅनीनं सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

इंस्टाग्रामवरील फेमस रील स्टार डॅनी पंडितनं लग्न केलंय. डॅनीनं सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. डॅनीनं नेहा कुलकर्णीशी लग्न केलंय. या लग्नानंतर डॅनी आणि नेहावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डॅनी पंडित म्हणजे मुकेश पंडित हा इंस्टाग्रामच्या युगात प्रसिद्ध झालेला स्टार आहे. तो त्याच्या हटके व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असतो. व्हिडिओ सादर करण्याची त्याची स्टाईल जनरेशन झेडमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. 'पुणेरी मुलगा', 'अतरंगी रॅपर' म्हणूनही डॅनी ओळखला जातो. 

डॅनीच्या पत्नीचं नाव नेहा कुलकर्णी आहे. ती VFX आर्टिस्ट आहे. त्याचबरोबर तिला पेंटींगची देखील आवड आहे, अशी माहिती समजतीय. डॅनी आणि नेहाची जोडी एकमेकांना पूरक आहे, असं मत नेटीझन्स व्यक्त करत आहेत. 

डॅनी पंडितचा जन्म मध्यमवर्गीय घरात झाला. त्याच्या वडिलांचं पानाचं दुकान होतं. त्यानं बीकॉम, एलएलबी तसंच कंपनी सेक्रेटरीपर्यंतचं शिक्षण घेतलंय. डॅनीला लहानपणी अनेक टोपणनावं होती.  सुप्रसिद्ध अभिनेता डॅनी डेन्झोंग्पावरून डॅनी हे नाव देखील त्याचं ठेवलं होतं. त्यानं मुकेश ऐवजी डॅनी हे नाव वापरण्याचं ठरवलं.

Advertisement

( नक्की वाचा : बंगळुरुतील इंजिनिअर अतुल सुभाषची पत्नी Nikita Singhania कोण आहे? सोशल मीडिया तिच्यावर संतप्त का? )

डॅनीला लहाणपणापासूनच व्हिडिओ बनवण्याची आवड होती. आई आणि मोठ्या बहिणीच्या मोबाईलवरुन आपण व्हिडिओ करत असू अशी माहिती त्यानं एका व्हिडिओत दिली होती.

Topics mentioned in this article