Daughter Leave Parents To Live in With Boyfriend Viral Video: हल्लीच्या तरुणाईवर प्रेमाची भुरळ पडली आहे. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत तरुण- तरुणी काहीही करायला तयार असतात. अगदी काल परवा आयुष्यात आलेल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडसाठी आपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या आई वडिलांचाही यांना विसर पडतो. राजस्थानमध्ये अशीच एक मन सुन्न करणारी, संतापजनक अन् सामाजिक भान हरपल्याची जाणीव करुन देणारी घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Daughter Leave Parents Home For Boyfriend Viral Video)
हताश आईचा आक्रोश, निर्दयी लेकीचं संतापजनक कृत्य
राजस्थानच्या जोधपूरमध्ये (Rajathan Viral Video) लिव्ह इन रिलेशनचा एक हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरातून बेपत्ता झालेल्या एका मुलीला पोलिसांनी शोधून काढत तिच्या घरी आणले. यावेळी त्या मुलीने आपल्याला प्रियकरासोबतच राहायचे असल्याचे जाहीर केले. समोर आईचा आक्रोश, आजोबांची विनवणी सुरु होती, पण या सर्वांकडे ढुंकूणही न पाहता मुलीने बॉयफ्रेंडसोबत जाणार असल्याचे सांगितले अन् निघूनही गेली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार एका मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत अशी मुले नसलेली बरी अशा उद्विग्न प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ASI Heart Attack: चालता चालता जीव गेला! ASI जवानाला हार्ट अटॅक; मृत्यूचा लाईव्ह VIDEO
बॅग भरली अन् आईकडे न पाहता निघून गेली
ही संपूर्ण घटना जोधपूरच्या ग्रामीण भागातील ओसियां (Osiyan) परिसरातील आहे. येथील एका गावात राहणारी तरुणी काही दिवसांपूर्वी अचानक लापत्ता झाली होती. कुटुंबीयांनी पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. तपासात ती एका युवकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या युवतीला तिच्या घरी आणल्यानंतर तिचे कुटुंबीय, विशेषतः आई आणि आजोबांनी आक्रोश करत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काळ्या कपड्यांमध्ये असलेली ही तरुणी एका निर्विकार चेहऱ्याने घरात जाते. बॅगमध्ये काही सामान भरते आणि थेट पोलिसांकडे येऊन प्रेमीसोबतच लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय जाहीर करते. आई आणि अन्य कुटुंबीय तिला ओळखून घेण्याचा प्रयत्न करत असताना, तिने चक्क आपल्या आईला आणि कुटुंबीयांना ओळखण्यासही स्पष्ट नकार दिला.
अशी लेक नसलेली बरी.. नेटकऱ्यांचा संताप
यावेळी पोलिसांनीही तरुणीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने, अखेरीस पोलिसांनी कायद्याचा हवाला देऊन तिला आपल्यासोबत नेले. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना आई वडिलांची कष्टही विसरली ही मुलगी, अशी लेक नसलेली बरी, असं म्हटलं आहे. तरं आणखी एका नेटकऱ्याने कसला हा निर्दयीपणा, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.