Extra Marital Affair Fight : एका पत्नीनं तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. त्या दोघांना एकत्र पाहाच पत्नीचा पारा चढला. त्यानंतर भर रस्त्यावरच तिघांमध्ये जोरदार हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू झाला, ज्याची सुरुवात शिवीगाळ आणि अखेर मारामारीने झाली. या संपूर्ण मारामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील हे प्रकरण आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या महिलेला तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधावर आधीपासूनच संशय होता. महाराजपूर भागात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीला नरवल मोडजवळ त्याच्या प्रेयसीसोबत पाहिले. पत्नीला पाहताच पती आणि प्रेयसीचे धाबे दणाणले आणि रस्त्यावरच भांडणाला सुरुवात झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पती-पत्नीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, थोड्याच वेळात वाद इतका वाढला की, पतीने पत्नीवर हात उगारून तिला थप्पड लगावली.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
पत्नीचा संताप प्रेयसीवर
पतीचे हे कृत्य पाहून पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने तिचा संपूर्ण संताप प्रेयसीवर काढला. पत्नीने प्रेयसीला पकडून तिची जोरदार पिटाई सुरू केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पतीलाही पत्नीने सोडले नाही आणि त्यालाही थप्पड मारली.
रस्त्यावर सुमारे 20 मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यामध्ये लाथा, बुक्क्या आणि थप्पडांची बरसात झाली. या दरम्यान, तिथे बघ्यांची मोठी गर्दी जमली आणि अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता व्हायरल होत आहे.
पोलीस तपास सुरू, तक्रार नाही
काही स्थानिक लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद अखेरीस शांत झाला. या व्हायरल व्हिडिओबद्दल महाराजपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महाराजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय पाण्डेय यांनी एनडीटीव्हीला फोनवर बोलताना सांगितले की, पती-पत्नी बम्बूरीहा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी या व्हायरल व्हिडिओला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणत्याही बाजूने लिखित तक्रार (complaint) दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
इथे पाहा Video