Katihar Railway Station Cucumber Video: रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हीही ताज्या काकड्या घेऊन त्यावर मीठ टाकून त्याचा आस्वाद घेत असाल तर जरा थांबा. ज्या काकड्या तुम्ही ताज्या समजून आवडीने खात आहात त्या रायायनिक विषाने भरलेल्याही असु शकतात. बिहारच्या कटिहार रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचीही झोप उडेल. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा...
Expensive Water Bottle: जगातील सर्वात महागडी Water Bottle; किंमतीत येईल आलिशान फ्लॅट; खासियत काय?
रेल्वे स्टेशनवरील काकडी खाताना सावधान!
रेल्वे प्रवासात उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर गारवा मिळावा म्हणून अनेक प्रवासी काकडी खरेदी करतात. मात्र, कटिहार स्थानकावर समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओने प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. शिळ्या काकड्यांना ताज्या दाखवण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला जात असल्याचे या व्हिडिओतून समोर आले असून, यामुळे खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला विक्रेता निळ्या रंगाच्या रासायनिक द्रावणात काकडी बुडवून ती हिरवीगार करताना दिसत आहे. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने रेल्वेच्या खाद्य सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 'एक्स' (ट्विटर) वर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला असून रेल्वे प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.
'जॉनी जॉनी, येस पापा...' मुलांसाठी घातक, शिक्षण मंत्र्यांचा पालकांना इशारा; नेमकं कारण काय?
प्रवाशांनी स्थानकावर किंवा खिडकीवर पदार्थ खरेदी करताना त्याची चमक न पाहता गुणवत्तेची खात्री करावी, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. पुढच्या वेळी स्टेशनवर एखादी जास्तच चमकदार काकडी दिसल्यास, आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा. डोळ्यांना भुरळ घालणाऱ्या चमकीवर अवलंबून राहण्याऐवजी, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण ही रंगीबेरंगी काकडी तुम्हाला रुग्णालयात दाखल करू शकते.