Viral Video : रोजा सोडण्याआधी गायली गणेश वंदना, 'या' मुस्लीम मुलानं अख्ख्या देशाला शिकवला 'मानवता धर्म'

ईदचं सेलीब्रेशन सुरु असतानाच असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने अनेकांच्या हृदयाला भावनिक स्पर्श केला आहे. इफ्तार पार्टीत रोजा सोडण्याआधी एका मुलाने सुरेल आवाजात गणेश वंदना गायली. व्हिडीओ झाला व्हायरल.

जाहिरात
Read Time: 2 mins
Muslim Boy Viral Video

Kerla Muslim Boy Video: ईदचं सेलीब्रेशन सुरु असतानाच असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने अनेकांच्या हृदयाला भावनिक स्पर्श केला आहे. इफ्तार पार्टीत रोजा सोडण्याआधी एका मुलाने सुरेल आवाजात गणेश वंदना गायली. या मुलाचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इफ्तारची वेळ..समोर पंचपक्वान, घरात कमालीची शांतता. प्रत्येक जण रोजा सोडण्याची वाट पाहत होता.तेव्हा अचानक एका निरागस मुलाच्या आवाजाने घरातील परिसर दुमदुमतो. 'गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमही...', असं म्हणत या मुलाने सुरेल आवाजात गणेश वंदना गायली. रॉबिन झायन असं या मुलाचं नाव आहे. रॉबिनचा व्हिडीओ पाहून लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालंय. 

रोजा सोडणाऱ्या मुलाचं देशभरात होतंय कौतुक

20-21 मार्चला संपूर्ण देशात ईद उत्सव दिमाखात साजरा झाला. याच दरम्यान रॉबिनचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. व्हिडीओत पाहू शकता की, रॉबिन इफ्तारच्या वेळी डायनिंग टेबलवर बसलेला असतो. त्याच्या समोर फळं, समोसे आणि मिठाई असते. पण सर्वात खास क्षण तेव्हा येतो, जेव्हा तो रोजा सोडण्याआधी श्री गणेश वंदना गातो.  एका बाजूला रोजा, दुसरीकडे गणेश वंदना...या क्षणामुळे अनेकांचा आनंद द्विगुणीत झाला असेल,  पण हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.धर्म वेगळे असू शकतात पण मानवता धर्म सर्वात पुढे आहे. 

Advertisement

व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षाव 

रॉबिनचा हा सुंदर व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक त्यांचं आणि कुटुंबियांचं खूप कौतुक करत आहे. काही लोकांना याला रिअल केरला स्टोरी असंही म्हटलं आहे.दाक्षिणात्य कलाकारांनीही या व्हिडीओला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.