Harsha Richariya viral video : महाकुंभच्या सुरुवातीपासून हर्षा रिछारिया यांचं नाव चर्चेत आहे. सोशल मीडियावर हर्षा यांना सर्वात सुंदर साध्वी असं नाव मिळालं आहे. 30 वर्षांच्या हर्षा यांचा कुंभमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.
हर्षा महाकुंभातील प्रवेशाच्या वेळी निरंजनी आखाड्याच्या रथामध्ये बसल्या होत्या. त्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. काही संतांनी त्यांनी रथामध्ये बसण्यावर तसंच भगवं वस्त्र परिधान केल्याबद्दल आक्षेप नोंदवला. हा वाद इतका वाढला की हर्षा यांनी रडत-रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हर्षा यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर (पूर्वीचे नाव ट्विटर) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या धाय मोकलून रडताना दिसत आहेत. त्यांनी कुंभमेळा सोडण्याचं कारण देखील या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
का सोडत आहेत कुंभ?
या व्हिडिओमध्ये हर्षा यांनी सांगितलं की, 'लोकांना लाज वाटली पाहिजी. जी मुलगी धर्माच्या जवळ जाण्यासाठी, तो समजण्यासाठी, सनातन संस्कृती समजून घेण्यासाठी इथं आली होती. त्याला तुम्ही ती कुंभमध्ये राहू शकेल इतकंही पात्र सोडलं नाही. महाकुंभ आयुष्यात एकदा येतो. तुम्ही हा कुंभ माझ्यापासून हिसकावून घेतला. याच्या पुण्याबाबत तरी माहिती नाही. पण, तुम्ही आनंद हिसकावून घेतला आहे. त्याचं पाप तुम्हाला नक्की लागेल.
हर्षा यांनी पुढं सांगितलं की, काही जणांनी मला संस्कृती समजून घेण्याची संधीच दिली नाही. माझी चूक काय आहे? 24 तास या कॉटेजमधूनच पाहण्यापेक्षा मी इथून निघून जाणंच उत्तम आहे.
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
कोण आहेत हर्षा रिछारिया?
30 वर्षांच्या हर्षा या उत्तराखंडच्या आहेत. त्यांचं मूळ घर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आहे. इन्स्टाग्राम पेजमुळे चर्चेत आलेल्या हर्षा यांनी स्वत:ची ओळख अँकर, मेकएअप आर्टिस्ट, सोशल मीडिया इन्फ्लूएंंसर आणि ट्रॅव्हरल ब्लॉगर अशी सांगितली आहे.