Tiger can leap more than 30 feet Video: पश्चिम बंगालमधील सुंदरबनमधून एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक रॉयल बंगाल टायगर (Royal Bengal Tiger) सहज चालत येत, अजिबात न धावता थेट नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर उडी मारताना दिसत आहे. हे दृश्य इतके भारी आहे की ज्याने पाहिले तो पाहतच राहतोय. हा व्हिडिओ जुना असला तरी, तो पुन्हा एकदा वेगाने व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाघाने एका झटक्यात ओलांडली नदी (Majestic Tiger Leap)
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले सुंदरबन, रॉयल बंगाल टायगरचे नैसर्गिक निवासस्थान आहे. हा प्रदेश त्याच्या घनदाट खारफुटीच्या जंगलांसाठी आणि धोकादायक दलदलीच्या भागांसाठी ओळखला जातो. या आव्हानात्मक परिस्थितीतही इथल्या वाघांनी स्वतःला अद्भुत पद्धतीने जुळवून घेतले आहे आणि वेळोवेळी त्यांच्या शक्ती आणि चपळाईची अशी अद्वितीय उदाहरणे पाहायला मिळतात.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
वाघाची नदी पार करण्याची रॉयल झेप (Powerful Tiger Jump)
या व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ नदीच्या किनाऱ्यावर येतो, काही सेकंद थांबतो आणि मग अचानक जोरदार उडी मारतो. त्याने सुमारे 30 फूट अंतर न धावता पार केले, असे सांगितले जात आहे. वाघाची ही शक्ती, संतुलन आणि आत्मविश्वास इंटरनेट युझर्सना खूप आवडतोय. एका सोशल मीडिया युझरनं लिहिले, 'इतक्या सहजतेने उडी मारली जणू काही फक्त 50% ताकद लावली असेल." तर दुसऱ्याने म्हटले, 'त्याला धावण्याचीही गरज पडली नाही, विचार करा त्याच्यात किती ताकद असेल.'
व्हिडिओचा इंटरनेटवर धुमाकूळ (Tiger River Crossing)
वाघ उत्कृष्ट जलतरणपटू असतात, परंतु या वाघाने पाण्यात जाण्याऐवजी उडी मारणे पसंत केले. यावरून हे देखील स्पष्ट होते की वाघ केवळ शक्तिशाली नसतात, तर ते हुशार देखील असतात. त्यांना वाटते की पाण्यात जाणे टाळता येऊ शकते, तेव्हा ते उडी मारून आपली ऊर्जा आणि वेळ दोन्ही वाचवतात.
हा व्हिडिओ केवळ रॉयल बंगाल टायगरची भव्यता आणि ताकद दर्शवत नाही, तर आपल्याला त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देतो.