Shocking: लग्नाच्या जेवणात हा काय प्रकार? प्रत्येक रोटीवर थुंकणाऱ्या व्यक्तीचा Video Viral

Man Spitting on Tandoor Roti in Wedding : एका लग्न समारंभात अत्यंत घृणास्पद आणि सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक कृत्य समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Man Spitting on Tandoor Roti : दानिश असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
मुंबई:

Man Spitting on Tandoor Roti in Wedding : एका लग्न समारंभात अत्यंत घृणास्पद आणि सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक कृत्य समोर आले आहे. लग्नात स्वयंपाकी म्हणून काम करत असलेल्या एका  व्यक्तीने तंदूरमध्ये रोटी भाजण्यापूर्वी त्यावर थुंकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील हा किळसवाणा प्रकार आहे. हा प्रकार  प्रकार उघडकीस येताच वऱ्हाडी मंडळींनी मोठा गोंधळ केला. या घटनेची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

बुलंदशहरच्या पहासू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटेरना (Aterna) गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथील एका लग्न समारंभात पाहुण्यांसाठी जेवण बनवण्याचे काम सुरू होते. आरोपीचे नाव दानिश असल्याचे सांगण्यात येत आहे. तो तंदूर रोटी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये होता.

( नक्की वाचा : Viral News: भाच्याच्या लग्नात मामांनी दिली 2 कोटींचा मायरा, 1.1 कोटी कॅश , 31 तोळं सोनं, वाचा काय आहे पद्धत? )
 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दानिश प्रत्येक तंदूर रोटी तंदूरमध्ये टाकण्यापूर्वी तिच्यावर थुंकताना स्पष्टपणे दिसत आहे. तो एका पाठोपाठ एक, अनेक रोट्या याच संशयास्पद पद्धतीने बनवत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.

Advertisement

दानिशच्या या संशयास्पद हालचाली एका वऱ्हाडी युवकाच्या लक्षात आल्या, ज्याने आपल्या मोबाईलमध्ये चुपचाप याचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच, उपस्थित लोकांमध्ये तसेच संपूर्ण परिसरामध्ये तीव्र संताप आणि आक्रोश पसरला.

वऱ्हाड्यांचा गोंधळ

तंदूर रोटीवर थुंकल्याचा हा किळसवाणा प्रकार वऱ्हाडी मंडळींना समजताच त्यांनी लग्न समारोहात जोरदार गोंधळ घातला.  या व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तातडीने आरोपी दानिश याच्याविरोधात FIR (प्रथम माहिती अहवाल) नोंदवला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 'थुंकबाज' दानिशला अटक केले. आरोपी दानिश हा बुलंदशहर येथील पहासू परिसरातील पठान टोला येथील रहिवासी आहे.

Advertisement

या प्रकारच्या कृत्यामुळे केवळ लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेतच. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सध्याच्या साथीच्या काळात, अशा बेजबाबदार कृत्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती वाढते.

पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली आहे. या घटनेमुळे अन्न शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेच्या नियमांविषयी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article