Mircale Baby Delivery: उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यात एक दुर्मिळ घटना समोर आली आहे, जिथे एका ३१ वर्षीय महिलेने पाच दिवसांत चार मुलांना जन्म दिला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत एका महिलेने चार मुलांना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्राथमिक तपासणी आणि अल्ट्रासाऊंडवरूनच त्यांना समजले होते की, महिलेच्या पोटात चौळी मुले आहेत, असे प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
पाच दिवसात 4 बाळांना जन्म
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्मिळ घटना तीर्थंकर महावीर विद्यापीठ (टीएमयू) रुग्णालयात घडली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या कुटुंबाला तिच्या गर्भधारणेतील धोक्यांविषयी माहिती देण्यात आली होती, तरीही त्यांनी चारही मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला. अमिनाच्या प्राथमिक तपासणीत तिच्या पोटात चौळी मुले असल्याचे उघड झाले, त्यानंतर रुग्णालयाची विशेष वैद्यकीय टीम तिच्यावर सतत लक्ष ठेवून होती.
Mumbai To Alibaug Ferry : अलिबागचा प्लॅन फिस्कटणार! मुंबई- मांडवा जलवाहतूक बंद; कारण काय?
विशेष म्हणजे अवघ्या पाच दिवसांत चौळी मुलांना जन्म देणाऱ्या महिलेची ही पहिलीच घटना आहे. या महिलेला ६ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९ मे रोजी अमिनाने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर १४ मे रोजी तिने आणखी एका बाळाला जन्म दिला, ज्यात एक मुलगा आणि दोन मुली होत्या. अशाप्रकारे एकूण पाच दिवसांत चार मुलांना जन्म दिला.
रुग्णालयात आई आणि मुलांच्या काळजीसाठी विशेष व्यवस्था
रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आई आणि मुलांच्या काळजीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिलेचे पती, अलीम म्हणाले की, ही त्यांची पहिली प्रसूती असून संपूर्ण कुटुंब आनंदाने भरून गेले आहे. त्यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभारही मानले. रुग्णालय प्रशासनाच्या मते, रुग्णालयात पहिल्यांदाच असे घडले आहे की एका महिलेने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे चार मुलांना जन्म दिला आहे.