Transgender Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुलांनी एक अनोखा आणि धक्कादायक प्रयोग केला आहे. जर तृतीयपंथी बनून रस्त्यावर पैसै मागितले तर एका दिवसात किती कमाई होऊ शकते, याचा शोध घेण्यासाठी या मुलांना भन्नाट शक्कल लढवली. हा प्रयोग एकाने नाही,तर दोन भावांनी मिळून केला. दोघांनी तृतीयपंथीयांसारखी साडी नेसली आणि मेकअप करून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
तृतीयपंथी बनून बाजारात गेल्यावर काय घडलं?
व्हिडीओत पाहू शकता की,दोन्ही भावांचा मेकअप कोणत्याही प्रोफेशनल आर्टिस्टने केलेला नाही,तर त्यांच्या आईने केला आहे. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हिडीओत आई दोन्ही मुलांचा मेकअप करताना दिसते,त्यानंतर दोघे साडी नेसून तृतीयपंथींयासारखं मेकअप करता. त्यानंतर हे दोघेही
घराबाहेर पडतात आणि रस्त्यावर फिरत लोकांकडून पैसे मागतात.पण त्याचदरम्यान काही लोक त्यांचा व्हिडीओ शूट करतात. त्यांच्या हातात बंदूक असते, तरीही हे दोघे न घाबरता त्यांच्याजवळ जातात आणि तृतीयपंथीयांसारखा बोलणं करून त्यांच्याकडून पैसे घेतात.
नक्की वाचा >> GK: नववर्षात सर्वात पहिलं सूर्योदय कुठे झालं? जगातील एकमेव ठिकाण, जिथे सर्वात आधी होते 1 जानेवारीची मध्यरात्र
त्यानंतर ते फालुदा विक्रेत्याकडे जातात आणि त्यांच्याकडूनही पैसे घेतात. पुढे ते ३-४ दुकानांवर थांबून अशाच प्रकारे पैसे मागतात.दिवसभर हे दोन्ही भाऊ रस्त्यावर फिरत लोकांकडून पैसे घेताना दिसतात. याआधी त्यांनी सिग्नलवर तृतीयपंथी बनून पैसे मागितले होते,असंही ते व्हिडीओत सांगतात.पण हे काम करताना त्यांना खूप लाज वाटत होती.
व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @SaffronSunanda या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,'या कंटेंटची नक्कल कोणी करू शकत नाही'.या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.तसच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.