Rinima Borah: हिंदू मुलींना प्रेमात पाडून त्यांना नंतर जबरदस्तीनं मुस्लीम धर्माचा स्विकार करण्यास भाग पाडण्याच्या पद्धतीला 'लव्ह जिहाद' (Love Jihad) असं नाव देण्यात आलं आहे. या प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत, असा काही जणांचा दावा आहे. पण, त्याचवेळी याबाबतची वेगवेगळी धक्कादायक प्रकरण उघडकीस आली आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये कायदेही करण्यात आले आहेत. 'लव्ह जिहाद' ला बळी पडलेल्या यादीमध्ये मिसेस इंडिया गॅलेक्सी रिनीमा बोराचाही समावेश आहे. रिनिमानंच एका पॉडकास्टमध्ये तिचा हा धक्कादायक भूतकाळ सांगितला आहे.
मिसेस इंडिया गॅलेक्सी 2024 (Mrs. India Galaxy 2024) ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकल्यानंतर रिनीमाचं नाव सध्या चांगलाच चर्चेत आहे. ओबाम भुयान यांच्या 'अनटोल्ड पॉडकास्ट'वर बोलताना रिनिमानं तिचा अनुभव सांगितला आहे. ती लव्ह जिहादाला बळी कशी पडली, तिला या प्रकरणात काय सहन करावं लागलं? हे सर्व रिनिमानं सांगितलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
16 वर्ष सहन केलं...
मी हा सर्व अनुभव 16 वर्ष सहन केला आहे. ते सर्व विसरण्यासाठी मला अनेक वर्ष लागली. आजही मी रोज ते दिवस संपले म्हणून स्वत:ची समजूत घालते. अनेक लोकांना तो प्रकार माझ्याच चुकीमुळे घडला असं वाटतं,' असं रिनीमा म्हणाली.
रिनिमानं सांगितलं की, 'मी वयाच्या 16 व्या वर्षी आसाममधून बंगळुरुला शिक्षणासाठी आले. एक मुस्लीम मुलगा माझा बॉयफ्रेंड बनला. तो मला माझ्या चांगल्यासाठी रागवतोय, असं मला वाटत असे. त्याची वागणूक पाहून मी कधी-कधी त्याला मजेनं तालिबान देखील म्हणत असे.
त्यानं मला बेदम मारहाण केली. मला गोमांस खायला लावलं. त्यानं मला जबरदस्तीनं गोमांस खायला लावलं, तो दिवस मला आजही आठवतो. त्याच्या पालकांनी मला गोमांस खाण्याची जबरदस्ती केली होती. त्यांनी माझं रिनिमा बोरा हे नाव बदलून आयेशा हुसेन ठेवलं होतं. त्यांनी मला नमाज पडायला लावला.'
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )
हा सर्व जवळपास 'लव्ह जिहाद'चा प्रकार होता, असं रिनिमानं या पॉडकास्टमध्ये सांगितलं. तो (माजी मुस्लीम बॉयफ्रेंड) हा पॉडकास्ट नक्की पाहात असेल. मी त्याला सोडलं तर चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी त्यानं दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोटही रिनीमानं केला.
रिनिमानं प्रसिद्ध आसामी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा अनुभव सांगितला आहे. या मुलाखतीमधील हा भाग सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.