चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने दाखवतात की खूप संघर्ष होतो मात्र अखेर ही गोड होते, तसंच काहीसं 8 मूलांक असलेल्यांसोबत होतं. या व्यक्तींना 35-40 वर्षांपर्यंत प्रचंड कष्ट करावे लागतात. साध्या साध्या गोष्टीही त्यांना मिळवताना प्रचंड मेहनत करावी लागते. ज्या गोष्टी इतरांसाठी साखरेच्या दाण्यासारख्या असतात त्या 8 मूलांक असलेल्यांसाठी हिमालयासारख्या होतात. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना चांगले दिवस पाहायला मिळतात. हे जरी खरं असलं तरी कष्ट त्यांची पाठ सोडत नाही. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो, त्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि यशाचे अनोखे मिश्रण असते. अंकज्योतिषी भावना उपाध्याय (Bhavana Upadhyay) आणि अॅस्ट्रो अरुण पंडित (Astro Arun Pandit) यांनी 8 मूलांक असलेल्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्ये, आव्हाने आणि त्यांच्यासाठी उपयुक्त उपायांबद्दल माहिती दिली आहे.
कसा असतो मूलांक 8 वाल्या व्यक्तींचा स्वभाव?
भावना उपाध्याय यांच्या मते, 8 नंबर हा शनिदेवाचा (Lord Shani) अंक मानला जातो. मूलांक 8 असलेले लोक खूप पैसे कमावतात, परंतु त्यासाठी त्यांना अतोनात कष्ट करावे लागतात. आयुष्यात, विशेषतः 35 वर्षांपर्यंत त्यांना खूप संघर्ष करावा लागतो.
अॅस्ट्रो अरुण पंडित सांगतात की, 8 मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी 2024 च्या तुलनेत 2025 हे वर्ष अधिक चांगले असेल. 2025 मध्ये त्यांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते. मात्र, या व्यक्तींना पोटाच्या समस्या आणि सकाळी उठल्यानंतर प्रचंड थकवा जाणवू शकतो. 8 हा अंक कठीण मानला जातो आणि या व्यक्तींना आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. इतरांसाठी सोप्या असलेल्या गोष्टी 8 मूलांकाच्या लोकांसाठी कठीण ठरतात.
आर्थिक कौशल्ये आणि मदत करण्याची वृत्ती
8 मूलांक असलेल्या व्यक्ती आर्थिक सल्ल्याबाबतीत उत्तम असतात. पैसा कसा वाचवायचा आणि कुठे गुंतवायचा याबद्दल त्या इतरांना चांगला सल्ला देतात. या व्यक्ती इतरांची मदत करतात, पण त्यामागील गणितेही त्यांना चांगलीच माहीत असतात.
दिलासा मिळण्यासाठी मूलांक 8 वाल्यांनी काय करावे ?
भावना उपाध्याय यांच्या मते, गरिबांची सेवा केल्याने 8 मूलांक असलेल्या व्यक्तींची प्रगती होते. शनिदेव जेव्हा देतात, तेव्हा ते भरभरून देतात आणि भरभराट करतात. शनिदेवाची आराधना करून मनोमन एखादी इच्छा व्यक्त केल्यास, शनिदेव ती पूर्ण करतात असे मानले जाते. अॅस्ट्रो अरुण पंडित यांनीही लोकांची मदत करणे हाच 8 मूलांकाच्या व्यक्तींसाठी सर्वात चांगला उपाय असल्याचे म्हटले आहे.