Mumbai Viral Video : मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी-हिंदी भाषेचा वाद वाढण्याची शक्यता आहे. भांडुप भागातील साई राधे नावाच्या एका इमारतीमध्ये डोमिनोज पिझ्झा (Domino's Pizza) देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका जोडप्यानं पैसे देण्यास नकार दिला. रोहित असं डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. रोहितला मराठी येत नव्हतं म्हणून त्याला या इमारतीमधील एका जोडप्यानं पैसे देण्याचं नाकारलं. त्यांनी पैसे हवे असतील तर मराठीमध्ये बोलावाचं लागेल, आमच्याकडे असचं असतं, असं रोहितला सुनावलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहितनं ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केली आहे. या व्हिडिओमध्ये ग्राहक रोहितला मराठीमध्ये बोलण्यास सांगत आहे. त्यानंतर रोहितला पैसे न घेताच परत जावं लागलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे या ग्राहकानं पैसे तर दिलेच नाहीत पण, त्याचबरोबर पिझ्झा देखील स्वत:कडेच ठेवला हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
( नक्की वाचा : पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण, वडिलांचा आधार असलेल्या कर्तबगार मुलीचा अपघाती मृत्यू )
- हे ग्राहक मराठी येत नसताना मराठी बोलण्याची जबरदस्ती करत आहेत, असं रोहित या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.
- यावर महिलेने ग्रील लावलेल्या दरवाजाच्या आतून उत्तर दिले - 'इथे असेच आहे'
- त्यानंतर डिलिव्हरी बॉय म्हणाला की असं कोण बोललं...
- व्हिडिओमध्ये दिसत आहे की डिलिव्हरी बॉय म्हणतो की येत नसेल तर मग ऑर्डर नाही करायचा ना. नाही द्यायचे ना पैसे, हा ठीक आहे, ठीक आहे.
- त्यानंतर महिला डिलिव्हरी बॉयला म्हणाली की माझा व्हिडिओ नाही काढायचा, मी तुमचा व्हिडिओ काढू शकते
- त्यानंतर डिलिव्हरी बॉय म्हणाला की ही कोणती जबरदस्ती आहे.
- त्यानंतर महिलेसोबत असलेल्या पुरुषाने दरवाजा बंद करायचा विचार केला, पण तेव्हाच महिलेने संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग सुरू केले.
- त्यानंतर दोघेही ऑर्डर खराब झाल्याबद्दल बोलू लागले, तेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणाला की दाखवा ना ऑर्डर खराब आहे तर दाखवा.
- डिलिव्हरी एजंटला पैसे न घेताच परत जावे लागले. संबंधित कंपनीने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.