Shocking News: अशक्य ते शक्य झालं! जन्माला येताच 'या' बाळाची 'गिनीज बुक'मध्ये नोंद, डॉक्टरांनाही बसला धक्का

Today Trending News: एका नवजात बालकाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बातमी वाचून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
Most Premature Baby In The World
मुंबई:

New Born Baby Guinness World Record : कधी कधी आयुष्यात सर्वात कठीण परिस्थितीतही आशेचा किरण पेटतो. ही कथा आहे एका नवजात बालकाची,ज्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये प्रकाशाची ज्योत पेटवली आहे. या बाळाबाबत डॉक्टरही 'अशक्य' असच म्हणत होते.पण नशिबाने त्याची स्क्रिप्ट वेगळीच लिहिली होती.अमेरिकेतील आयोवा सिटीमध्ये जन्मलेला हा छोटासा नैश आज जगाला सांगतोय की ‘चमत्कार' कधीही...कसा ही होऊ शकतो.फक्त 283 ग्रॅम वजनाने जन्मलेले हे बाळ जगातील सर्वात प्रीमॅच्युअर म्हणजे वेळेआधी जन्मलेले बाळ म्हणून ओळखले गेले आहे.

2024 मध्ये फक्त 21 आठवड्यांच्या गर्भावस्थेत जन्मलेल्या नैशने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कमावले. इतक्या कमी आठवड्यांत जन्म घेणे म्हणजे आयुष्याची शक्यता अत्यंत कमी असते,पण नैश...ज्याचे वजन त्या वेळी एका कप केक इतकेही नव्हते. पण नैश आज जीवन जगतोय आणि आता तो एक वर्षांचा झाला आहे. त्याचे हसू आणि त्याच्या छोट्या छोट्या हालचाली सांगतात की आयुष्याला कधीही हार मानू नये. 

नक्की वाचा >> OTP शेअर केला नाही, तरीही 28 लाखांचा गंडा! देशाचा निवृत्त कर्नल अधिकारी हॅकर्सच्या निशाण्यावर, APK फाईल अन्..

यापूर्वी बसला होता गर्भपाताचा धक्का 

NICU मध्ये 6 महिन्यांची लढाई सोपी नव्हती. पालक मोल्ली आणि रँडल यांना यापूर्वीच एक गर्भपाताचा धक्का बसला होता. डॉक्टरांनी त्यावेळीही स्पष्ट इशारा दिला होता, ‘जिवंत राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि राहिलं तरी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.' तरीही मोल्लीने आशा सोडली नाही. लेबर थांबवून नैशचा जन्म नेमक्या 21व्या आठवड्यात घडवून आणला. जिथे डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात एक नवी मर्यादा गाठली.

नक्की वाचा >> New Cars In India : आता Creta चा खेळ खल्लास! मारुतीलाही देणार टक्कर, 'या' कंपनीच्या 2 कार मार्केट करणार जाम

सहा महिन्यानंतर बाळ जेव्हा घरी परतला..

सहा महिन्यांनंतर, जेव्हा नैश आपल्या आई-वडिलांच्या कुशीत घरी परतला, त्याचा चेहरा आनंदाने उजळलेला होता. आजही त्याला ऑक्सिजन सपोर्ट आणि फीडिंग ट्यूबची गरज आहे. हृदयात एक छोटासा दोष आहे. जो डॉक्टरांच्या मते वेळेनुसार ठीक होऊ शकतो. तो अजून रांगत नाही, पण करवट घेतो, स्वतःला उभे करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या प्रत्येक हास्याने जगाला आशेचा संदेश देतो.
 

Advertisement