New Bride Video Viral : लग्नसोहळ्यातील अजब-गजब व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी नवरा मायकल जॅक्सनसारखं डान्स करून सर्वांना चक्रावून टाकतो. तर कधी नवरी डीजेच्या तालावर थिरकते.लग्नाची वरात निघाल्यावर नवी नवरी माहेरच्या घरी खूप रडते.पण एका नवरीनं सासरच्या घरी पोहोचल्यावर भन्नाट डान्स करून तिचा आनंद व्यक्त केला आहे. सुरुवातीला ती लाजते,पण नंतर डोक्यावरचा पदर काढून या नवरीने जबरदस्त डान्स केला. हे पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या ताई,माई, अक्का नवरीकडे बघतच राहिल्या.सासरी गेल्यावर नवरीचा आनंद गगनात मावला नाही. नवरीने सर्वांसमोर डान्स करून ती सासरच्या घरी आल्यावर किती खुश झाली,याचाच दाखला दिला आहे.
नवरीला पाहून सासरच्या लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं
व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं की,घरातील महिला नवी नवऱ्याचं स्वागत करतात.नवऱ्याची बहीण काकू आणि मावश्या सुरुवातीला नवरीला थोडासं डान्स करण्यासाठी सांगतात. पण जेव्हा नवरी मूडमध्ये येते, तेव्हा बॉलिवूड स्टाईलमध्ये डान्स सुरू करते.हे पाहून सासरच्या लोकांच्या डोळ्यांचे पारणं फिटतं.वजनदार लेहंगा आणि दागिन्यांमध्ये नटलेली नवरी हरियाणवी गाण्यावर ठेका धरते.त्यानंतर नवरीचा डान्स पाहून नवराही एका क्षणासाठी थक्क होतो.व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की,“नववधू सगळ्यांना किती आवडते”. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय,"ही सीमा हैदर तर नाही ना.."
इथे पाहा नव्या नवरीचा व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओला 2.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं, ही नवरी किती क्यूट आहे. तर अनेकांनी नवरीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलंय,"ही सीमा हैदरसारखी अजिबात दिसत नाही, खूपच गोड आहे ती..",अन्य एकाने म्हटलंय की, “सपना चौधरीलाही फेल केले.”