पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून जोरदार कारवाई केली आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशवादी ठिकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशननंतर पाकिस्तानमध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. या विषयावरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकानं ऑपरेशन सिंदूरची जोरदार प्रशंसा केली आहे. तसंच भारतीयांना न्याय देण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय, असं स्पष्ट सांगितलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या व्हिडिओमधील व्यक्ती दुबईमध्ये राहतो. त्याचे नाव अभय आहे. तो स्वत:ला पाकिस्तानी हिंदू असल्याचं सांगत आहे.या व्हिडिओमध्ये तो स्पष्ट सांगतोय, 'मी पाकिस्तानी आहे, आणि स्पष्ट सांगतोय की भारताला उत्तर देण्याचा पूर्ण हक्क आहे. तुम्ही पहिल्यांदा हल्ला करता आणि त्यानंतर त्यांनी उत्तर दिल्यानंतर अचानक शांतता आणि मानवाधिकाराच्या गोष्टी करु लागता. पहलगाम हल्ल्यात 26 निर्दोष मारले गेले. त्यावेळी कोणी शांततेच्या गोष्टी केल्या नाहीत. आता भारतानं उत्तर दिलं तर पाकिस्तान व्हिक्टिम कार्ड खेळत आहे.
( नक्की वाचा : 'भारतानं घुसून मारलं', खासदार रडले, नागरिकांचा सैन्यावर संताप, पाकिस्तानमधील भीतीचे पाहा Video )
व्हिडिओमधील त्या व्यक्तीने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोपही केला आहे 'भारत आणि पाकिस्तानला युद्ध नकोय. पण, जर तुम्ही दहशतवाद्यांना पोसले, तर ते एक दिवस तुमच्याच विरोधात येतील. भारताने हल्ला केला नाही, फक्त प्रत्युत्तर दिले आहे. आणि माझ्यासाठी हे युद्ध नाही, तर न्याय आहे.'
अभयने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट abhayy_s वर शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. त्याला 19 लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक केलं आहे. . बहुतेक युजर्सनी अभयच्या मताला पाठिंबा दिलाय. तसंच त्याच्या हिमतीची प्रशंसाही केली आहे. एका युजरने लिहिले - 'आता कुठे एका पाकिस्तानीने खरी गोष्ट सांगितली आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले - 'किती शानदार गोष्ट सांगितली आहे' तिसऱ्या युजरने लिहिले - 'खूप सोप्या आणि कमी शब्दांत सत्य समोर आणले.'