Pit Bull Attack: पिटबूलचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला, मालक खिदळत राहिला; संतापजनक VIDEO

Pit Bull Attack Viral Video: कुत्र्याच्या मालकाने जाणूनबुजून चिमुकल्याच्या अंगावर पिटबुलला सोडले. कुत्रा मुलाचा चावा घेत असताना तो हसत असल्याचेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pit Bull Attack On Child: मुंबईमधून पिटबुलच्या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.  पूर्व उपनगरात एका 11 वर्षाच्या मुलाला पिटबुलने चावा घेतला. धक्कादायक म्हणजे कुत्र्याच्या मालकाने जाणूनबुजून कुत्र्याला सोडले  आणि तो मुलाला चावत असताना समोर बसून हसताना दिसत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलाच्या पालकांनी त्या पिटबुलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये एका 11 वर्षाच्या चिमुकल्यावर पिटबुलने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा आणि कुत्र्याचा मालक रिक्षामध्ये बसला असताना हा प्रकार घडला. संतापजनक म्हणजे कुत्र्याच्या मालकाने जाणूनबुजून चिमुकल्याच्या अंगावर पिटबुलला सोडले. कुत्रा मुलाचा चावा घेत असताना तो हसत असल्याचेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

Viral Video: मराठी माणसाचा प्रामाणिकपणा पाहा! तुम्हीही कराल सलाम

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा चिमुकल्याच्या तोंडावर चावा घेत आहे तर कुत्र्याचा मालक त्याला खेचण्याऐवजी हसत हा सगळा प्रकार बघत आहे. तो कुत्रा मुलाचे कपडेही फाडतो. मुलगा कसाबसा रिक्षामधून बाहेर पडतो आणि पळून जातो. त्यानंतरही कुत्रा त्या मुलाच्या मागे धावला. हा सगळा प्रकार घडत असताना कुत्र्याचा मालक मात्र खिदळताना, या घटनेची मजा घेताना दिसत आहे.

हमजा असं या हल्ला झालेल्या मुलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने सांगितले की, कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला, माझे कपडे फाडले. मी कुत्र्याच्या मालकाकडे मदतीसाठी विनंती केली मात्र तो हसत राहिला. मी कसाबसा रिक्षातून पळून गेलो. मुलाने असाही दावा केला की त्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तो म्हणाला की लोक फक्त हल्ल्याचे व्हिडिओ बनवत होते

Advertisement

शुक्रवारी पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कुत्र्याचा मालक मोहम्मद सोहेल हसन (43) विरुद्ध गुन्हा दाखल केला.  या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 291 (प्राण्यांना निष्काळजीपणे सोडून देणे), 125 (साधी दुखापत करणे) आणि 125 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा