Rapido Driver Misbehaved With Woman : रॅपिडो कॅब ड्रायव्हर महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन करत असल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅब ड्रायव्हरच्या बेशिस्त वागणुकीमुळे महिला प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ऑनलाईन अॅप्सवर विश्वास ठेवून लोक कॅब बुक करतात. पण कधी कधी त्यांना काही ड्रायव्हरच्या असभ्य वर्तणुकीला बळी पडावं लागतं. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे. या महिला प्रवाशाने व्हिडीओ शेअर करत कॅब ड्रायव्हरसोबतचा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
कारचा व्हिडीओ शेअर करत महिलेनं म्हटलंय की, रॅपिडो ड्रायव्हरने मला रस्त्याच्या मधोमध उतरवलं आणि माझ्यासोबत गैरवर्तन केलं.माझे हात थरथरत होते. मी त्याची तक्रार करेन आणि त्याला शिक्षा नक्कीच देईल. यावर तो कॅब ड्रायव्हर म्हणतो, जे करायचं आहे करा.महिलेनं व्हिडीओत म्हटलंय की, ऑफिसमधून रात्री रॅपिडो कॅबने प्रवास करत होती. तेव्हा ड्रायव्हरने मोठ्या आवाजात गाणं लावलं होतं आणि ती फोनवर बोलत होती.त्यावेळी मी त्या ड्रायव्हरला आवाज कमी करण्यासाठी सांगितलं.तेव्हा त्याने अर्वाच्य भाषा वापरून माझ्याशी हुज्जत घातली.
'तुझ्या बापाची गाडी आहे..', कॅब ड्रायव्हर संतापला आणि..
तो म्हणाला, तुझ्या बापाची गाडी आहे..तुला सांगू का आता..मला काय करायचं आहे हे तू मला सांगणार का..तुला फोनवर बोलायचं असेल तर माझ्या गाडीतून बाहेर जा आणि तुझ्या बापाच्या कारमध्ये बस. त्यानंत ही महिला दुसरी रॅपिडो कार येईपर्यंत त्याच गाडीत बसून राहिली. त्यानंतर ड्रायव्हर संतापला आणि त्या महिलेला म्हणाला आता तू बघच..त्याने अचानक गाडी सुरु केली. नंतर महिलेनं कसंतरी त्याला गाडी थांबवायला सांगितलं.
त्यानंतर त्याने गाडी थांबवली आणि तो स्वत: कारमधून बाहेर निघाला. महिलेनं दुसरी कॅब बुक करून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिने ड्रायव्हरला शिक्षा देण्याचं ठरवलं आणि ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. कॅब ड्रायव्हरला पूर्ण रात्र जेलमध्ये ठेऊन त्याची धुलाई करू, असं पोलिसांनी महिलेला सांगितल्याचा दावा तिने केला आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत 30 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओला 8 हजारांहून जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये लोकांनी महिलेची बाजू मांडल्याच्या जास्त प्रतिक्रिया असल्याचं पाहायला मिळत आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की, तुम्ही बरोबर सांगितलं. आपल्याला अशा प्रकारच्या चालकांविरोधात लढलं पाहिजे. रॅपिडो ड्रायव्हरचा माज कधी उतरणार? असा सवालही एका यूजरने उपस्थित केला आहे.