Viral Video: RPF जवानाने ट्रेनमध्ये महिलेचा फोन हिसकावला, पण कारण ऐकून सगळे म्हणाले, 'सही किया!'

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 12,000 हून अधिक मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात.

जाहिरात
Read Time: 2 mins

RPF Officer Snatches Woman Phone From Train: ट्रेनच्या प्रवासादरम्यान खिडकीजवळ बसून मोबाईल वापरणे अनेकांच्या सवयीचे असते. मात्र, हीच सवय किती धोकादायक ठरू शकते, हे एका आरपीएफ (RPF) जवानाने दाखवून दिले आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या जवानाने चक्क एका महिलेच्या खिडकीतून तिचा फोन हिसकावून घेतला. त्यानंतर हसून त्याची गंभीरता समजावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे खिडकी शेजारी बसून फोन वापरणे टाळा. इथं आरपीएफ जवान होता तिथेच एखादा चोर ही असू शकतो. त्याचा फटका प्रवाशांना बसू शकते हे सांगण्याचा प्रयत्न या जवानाने केला आहे. 

नक्की वाचा - Palghar News: शेतकऱ्याची वाईट चेष्टा! विमा कंपनीने नुकसानापोटी दिले 2 रुपये 30 पैसे, मोबाईलवर मदतीचा मेसेज अन्

या व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक आरपीएफ अधिकारी (Railway Protection Force) गस्त घालत असल्याचे दिसते. ट्रेनमध्ये बसलेली एक महिला खिडकीजवळ मोबाईलमध्ये मग्न असते. त्याच वेळी हा अधिकारी अचानक हात घालून तिचा फोन झटक्यात हिसकावतो. अचानक झालेल्या या प्रकाराने महिला सुरुवातीला घाबरते. पण नंतर हा सुरक्षा जनजागृतीचा भाग असल्याचे लक्षात येताच ती हसून पोलिसांचे आभार मानते. 'थियरीपेक्षा हा धडा अधिक प्रभावी आहे,' असे मत अनेक लोक व्यक्त करत आहेत.

नक्की वाचा - Navneet Rana: नवनीत राणा पुन्हा चर्चेत! या वेळी कारण आहे त्यांची संपत्ती, आकडे पाहून डोळे फिरतील

दरवर्षी 12,000 हून अधिक फोन चोरी होते. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 12,000 हून अधिक मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात. यापैकी बहुतांश घटना ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर घडतात. त्यामुळे आरपीएफ जवानाने दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमची मेहनतीची कमाई क्षणात गमावली जाऊ शकते. या व्हिडिओला 3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ @choudhary0409 या इन्स्टाग्राम यूजरने पोस्ट केला आहे.  फक्त 24 तासांत याला 3 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. जवानाच्या या अनोख्या कल्पनेचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

Advertisement