सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आकाशात एकाच वेळी सात सूर्य दिसत आहेत. हा व्हिडिओ चीनचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा आश्चर्यकारक आणि अद्भुत व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकीत होतोय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा 18 ऑगस्टचा व्हिडिओ आहे. चेंग्दू हॉस्पिटलमधील एका महिलेनं हा व्हिडिओ शूट केलाय. काही जण या व्हिडिओला ब्रह्मांडचं अनोखं रुप म्हणत आहेत. तर काही जणांनी हा चमकत्कार असल्याचं जाहीर केलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
का दिसले 7 सूर्य?
ऑप्टिकल इल्यूजन आणि व्हर्च्युअल इमेजमुळे असं अनोखं दृश्य दिसलं आहे. हॉस्पिटलमधील खिडकीतून वांग नावाच्या महिलेनं हे शूट केलं होतं. खिडकीच्या काचेच्या प्रत्येक लेयरमध्ये एका नव्या सूर्याची प्रतिमा दिसत होती. तसंच लाईट रेफ्रेक्टिंगच्या कारणामुळे एकाच वेळी सात सूर्य दिसले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर युझर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'अखेर ग्लोबल वॉर्मिंगचं सत्य उजेडात आलं आहे,' असं एका युझरनं लिहलं आहे. तर एकानं हा प्रकार म्हणजे 'चुंबकीय क्षेत्रातील गडबड' असल्याचं जाहिर केलंय. एका युझरनं लाईटच्या प्रतिबिंबामुळे एकाच वेळी 7 सूर्य दिसल्याचा अंदाज व्यक्त केलाय.
तर, Reddit वर एका युझरनं याची तुलना होउ यी के या चीनी लोककथेशी केली. चीनमधील या लोककथेनुसार होउ यी हा एक तिरंदाज होता. त्यानं पृथ्वी जळण्यापासून वाचण्यासाठी 10 पैकी 9 सूर्य मारले होते.