Fact Check : शाहरुख खानच्या बायकोनं इस्लाम धर्म स्वीकारला? Viral फोटोचं सत्य काय?

Fact Check : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सतत चर्चेत असतो. शाहरुख खानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नव्या वर्षात शाहरुख खानचा फेक फोटो व्हायरल
मुंबई:

Fact Check : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सतत चर्चेत असतो. शाहरुख खानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत असते. शाहरुखची पत्नी गौरी आणि तीन मुलंही नेहमी चर्चेत असतात. शाहरुख हा मुस्लीम तर गौरी ही हिंदू आहे. गौरीनं लग्नानंतरही हिंदू धर्म बदललेला नाही. पण, काही दिवसांपासून एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांच्यासबोत मक्केत असल्याचं दिसत आहे. तसंच हा फोटो पाहून गौरीनं इस्लाम धर्म स्वीकारला असल्याची चर्चा देखील सुरु आहे. या सर्व प्रकरणाचं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा फायदा तसंच तोटा देखील आहे. AI चा वापर करुन तयार करण्यात आलेल्या डिजिटल व्हिडिओचा फटका अनेकांना बसला आहे. भारतामध्ये रश्मिका मंदाना, कतरीन कैफ आणि आमिर खानचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या डीपफेकचा ताजा फटका शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरीला बसला आहे. 

हा फोटो सर्वप्रथम नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये शाहरुख आणि त्याचे कुटुंब वर्षाच्या पहिल्या दिवशी मक्केला गेल्याचा दावा करण्यात येत होता. या फोटोत शाहरुख, गौरी आणि आर्यन मक्केतील भव्य मशिदीसमोर दिसत होते. गौरी पारंपारिक मुस्लीम पोशाखात दाखवण्यात आलीय. त्याचबरोबर तिने मुस्लीम धर्म स्विकारल्याचा दावा हा फोटो पाहून अनेकांनी केला होता.

( नक्की वाचा : Govinda राहतो पत्नीपासून वेगळा, सुनीताचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, पुढच्या जन्मात असा नवरा नको... )

अनेक सोशल मीडिया हँडलवरुन हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे चर्चा सुरु झाली होती. पण, हा फोटो AI चा वापर करुन तयार करण्यात आल्याची माहिती काही इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. 

Advertisement

गौरी काय म्हणाली होती?

करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात 2005 साली गौरी खान सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं आम्ही घरामध्ये परस्परांच्या धर्माचा सन्मान करत असल्याचं सांगितलं होतं. मी शाहरुख खानच्या धर्माचा आदर करते. पण, म्हणून मी धर्म परिवर्तन करुन मुसलमान होणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. प्रत्येक जण वेगळा व्यक्ती आहे. तो आपआपल्या धर्माचं पालन करत असतो. अन्य धर्माबद्दल आदर असलाच पाहिजे. शाहरुख कधीही माझ्या धर्माचा अपमान करणार नाही. मी कधीही त्याच्या धर्माचा अपमान करणार नाही. 

Topics mentioned in this article