Strange Wedding: आपल्या देशात लग्नाबाबत वेगवेगळ्या प्रथा आहेत. देशभरात लग्नाची पद्धत, लग्नातील विधी याबाबतही विविधता आढळते. हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्येही लग्नाची प्रथा निरनिराळ्या आहेत. निसर्गसौंदर्यानं लटलेल्या या छोट्या राज्यातील लोकपरंपरा आणि चालीरिती बऱ्याच वेगळ्या आहेत. यामधील काही ठिकाणी आजही एका स्त्रीने अनेक पती करण्याची (बहुपती प्रथा) प्रथा प्रचलित आहे. ही प्रथा आता कमी झालेली असली तरी अजूनही समाप्त झालेली नाही. याबाबतची एक नवं उदाहरण समोर आलंय. त्यामध्ये दोन सख्या भावानं एकाच तरुणीशी लग्न केलं आहे. त्यांनी असं का केलं? यामागे एक कारण देखील आहे.
कुणी केलं लग्न?
हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातल्या शिलाई भागातील दोन सख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न केलं आहे. याबाबतचं वृत्त 'एबीपी न्यूज' नं दिलंय. त्यांचं हे लग्न परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे दोन्ही वर आणि वधू उच्चशिक्षीत असूनही त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
या भागात प्राचीन प्रथा आहे. त्यानुसार संपत्तीचं विभाजन टाळण्यासाठी, तसंच संयुक्त कुटुंब पद्धती जिवंत ठेवण्यासाठी सख्खे भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात. या प्रथेचं पालन हिमाचलमधील दोन भावांनी केलं आहे.
( नक्की वाचा : आशिया खंडातील 'या' देशात मिळतात Rental Wife! कसा असतो करार? काय असतात अटी? )
शिलाई गावातील थिंडो घराण्यातील दोन तरुणांनं हे लग्न केलंय. हे लग्न संपूर्ण रितीरिवाजानुसार पार पडलं. 12, 13 आणि 14 जुलै असा तीन दिवस हा विवाह सोहळा सुरु होता. यावेळी कुटुंब आणि नातेवाईकांव्यतिरिक्त गावातील लोकांनीही विवाह सोहळ्यात सहभाग घेतला.
या लग्नाचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. जुन्या परंपरेचे पालन करत दोन सख्ख्या भावांनी एकाच युवतीशी लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे. तीन्ही नवविवाहित व्यक्ती या उच्च शिक्षित आहेत. एक नवरदेव जलशक्ती विभागात नोकरीला आहे, तर दुसरा नवरदेव परदेशात नोकरी करतो, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.