Sunjay Kapur Last Video : हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी ब्रिटनमध्ये पोलो खेळताना निधन झाले. संजय यांच्यावर काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडले?
संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांचे मित्र अजित नंदाल यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये संजय जमिनीवर निश्चल पडलेले दिसत आहेत आणि त्यांना सीपीआर दिला जात आहे. तसेच, बचाव पथके त्यांना पोलो मैदानावर शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही यात दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, संजय कपूर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते जमिनीवर पडलेले दिसत आहेत. त्यावेळी त्यांना वैद्यकीय मदत दिली जात होती. एक डॉक्टर त्यांची छाती दाबताना दिसत आहेत. त्यांना शुद्धीवर आणण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न होता. परंतु संजय यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. संजय कपूर यांच्या शेवटच्या क्षणाचा हा व्हिडिओ खरोखरच थरकाप उडवणारा आहे.
कसा झाला मृत्यू?
याबाबतच्या वृत्तानुसार, संजय यांना मॅचदरम्यान मधमाशी गिळल्याने हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे व्यावसायिक सल्लागार सुहेल सेठ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सूत्रांनी सांगितले की, कपूर यांना गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि त्यांनी खेळ थांबवण्यास सांगितले. ते मैदानाबाहेर पडले आणि नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )
संजय गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत होते. ते 'ऑरियस' (Aureus) टीमचे डिफेंडर होते. हा सामना हॉटेल व्यावसायिक जैसल सिंग यांच्या 'सुजान' (Sujan) टीम विरुद्ध होता. संजय यांच्यावर काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची माजी पत्नी करिश्मा कपूर दोन्ही मुलांसह उपस्थित होती.