हॉलीवूडपटांमध्ये टेलेपोर्टशन नावाची एक संकल्पना दाखवली जाते. आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने माणूस जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जगाच्या दुसऱ्या ठिकाणी सेकंदात पोहोचतो असं दाखवण्यात येतं. हे तंत्रज्ञान काल्पनिक असून अशी कोणतीही गोष्ट अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. चित्रपटांमध्ये क्वांटम ट्रॅव्हल नावाचीही एक संकल्पना दाखवली जाते. यामध्ये मानव अतिसूक्ष्ण होतो आणि एका विश्वातून दुसऱ्या विश्वात किंवा एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर विनासायास जातो असं दाखवण्यात आलं आहे. प्रत्यक्ष जगात असं काही घडत नाही, मात्र काही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले असून हॉलीवूडपटांमध्ये दाखवण्यात येणारी ही गोष्ट खरी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नक्की वाचा: या रहस्यमयी पुलावरुन कुत्रेच करतात आत्महत्या; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
हा माणूस कुठून आला ?
UFO Mania नावाच्या X अकाऊंटवरून ह व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला एका माणूस हवेतून अचानक प्रकट होतो असं दिसतं आहे. या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये काहींनी म्हटले आहे की हे व्हिडीओ एडीटींगद्वारे केलेलं आहे. काहींनी म्हटलंय की हे AI च्या मदतीने तयार करण्यात आलेलं आहे. काहींनी या गोष्टी खऱ्या असल्याचं म्हटलं आहे.
आता हा माणूस कुठून प्रकट झाला?
याच X हँडलवर आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. टीव्ही चॅनलसाठी रिपोर्टरचं लाइव्ह सुरू असताना एक माणूस अचानक हवेतून प्रकट झाल्यासारखा दिसतो आणि चालत निघून जातो असं दिसतं आहे.
या व्हिडीओवरच्या काही कॉमेंट पाहिल्यानंतर काहींनी हा व्हिडीओ खरा असल्याचे म्हटले आहे तर काहींनी या व्हिडीओवर शंका उपस्थित केली आहे. शंका उपस्थित करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, तांत्रिक बाबींमुळे टीव्हीवर अशा गोष्टी दिसतात असं काहींचे म्हणणे आहे तर काहींनी हा माणूस टाईम ट्रॅव्हल करणारा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ 16 तासांच्या काळात 12 लाख लोकांनी पाहीला आहे.
नक्की वाचा: अमेरिकेत एक निर्णय अन् सोलापुरला येणार 'अच्छे दिन'? नेमकं काय घडलं?
उलट सुलट तर्क-वितर्क बांधणाऱ्यांची मोठी संख्या
अमेरिकेसह अन्य काही देशांमध्ये विविध थिएरी म्हणजेच एखाद्या गोष्टीची संभाव्य शक्यता मांडण्याची भलीमोठी परंपरा आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या सर्वसामान्य गोष्टी अमान्य करत त्यामागे काहीतरी काळंबेरं आहे असं म्हणत त्या घटनेचे विविध पैलू उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. प्राचीन काळात पृथ्वीवर परग्रहवासी आले होते, त्यांनी मानवाला पिरामिडसारख्या अजस्त्र रचना बांधण्यासाठी आणि आजच्या प्रगत काळातही शक्य नाहीत अशा गोष्टी त्या काळी आत्मसात करण्यासाठी मदत केली असा तर्क लावला जातो. हे तर्क लावणाऱ्यांची पुस्तकेही प्रसिद्ध होतात आणि ती प्रचंड खपाचीही ठरताना दिसतात.