Travel Vlogger Controversy: लोकप्रिय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर गॅरेट गी (Garrett Gee), 'द बकेट लिस्ट फॅमिली' (The Bucket List Family) च्या माध्यमातून ओळखला जातो. त्याने नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडीओमध्ये गी त्याचा 7 वर्षांचा मुलगा कॅलिहॅन (Calihan) याला लेक पॉवेल येथील एका कड्यावरून पाण्यात फेकताना दिसत आहे.
काय आहे नेमका वाद?
जुलै 2025 मध्ये हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये गी एका उंच कड्यावर मुलगा कॅलिहॅनसोबत उभा होता आणि त्याला प्रेरणा देणारे काहीतरी बोलत असल्याचे दिसत होते. मुलाला त्याच्या भीतीचा सामना करण्यास मदत करण्याच्या प्रयत्नात, गीने त्याला उचलले आणि खाली पाण्यात फेकले. या घटनेनंतर ऑनलाईन अनेक प्रतिक्रिया उमटल्या, ज्यात अनेकांनी एक पालक म्हणून गीनं मुलाबाबत केलेल्या कृतीवर जोरदार टीका केली.
गीचे टीकेला सडेतोड उत्तर
'पीपल मॅगझिन' (People Magazine) ला दिलेल्या मुलाखतीत गॅरेट गीने या वादाला उत्तर दिले आहे. तो म्हणाला, " एखाद्या व्यक्तीने फक्त तो व्हिडीओ पाहिला असेल, तर त्यांच्या टीकेवर माझे सहमत आहे. 'हाहा, हे खूप भयानक दिसत आहे, आणि हा वडील आपल्या मुलावर जास्त दबाव टाकत आहे.' पण ज्यांनी आमच्या प्रवासाला जास्त काळ फॉलो केले आहे, त्यांना पालक म्हणून आम्ही किती विचारपूर्वक आणि सावधगिरीने गोष्टी करतो हे माहीत आहे."
साहसी जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'द बकेट लिस्ट फॅमिली'ने गेल्या 10 वर्षांपासून जगातील रोमांचक आणि प्रेरणादायक क्षण लोकांसोबत शेअर केले आहेत. गीने जोर देऊन सांगितले की त्यांच्या साहसी आशयामध्ये Thrill-seeking (रोमांचक गोष्टी) चा समावेश असला तरी, त्यांच्या पालकत्वात सुरक्षितता (Safety) आणि भावनिक वाढ यालाच पहिले प्राधान्य दिले जाते.
गीने टिप्पणी केली, "मी नकारात्मक कमेंट्स वाचताना मला थोडं दुःख वाटत होतं, कारण त्यातून हे स्पष्ट होत होतं की किती लोकांना त्यांच्या पालकांकडून नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी प्रेरणा मिळाली नाही आणि ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्येच मध्येच राहिले." तो पुढे म्हणाला, "आयुष्य जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग नाही. ज्यांना हा व्हिडीओ पाहून खूप राग आला किंवा भीती वाटली, त्यांच्याबद्दल मला वाटले की 'मी त्यांच्यासोबत एका साहसी प्रवासाला जावे आणि त्यांना काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी मदत करावी'."
( नक्की वाचा : Love Story: 12वीच्या विद्यार्थिनीने केले शिक्षकाशी लग्न; Video शेअर करत पोलिसांकडे केली मोठी मागणी )
'हा इतरांसाठी सल्ला नाही'
मूळ पोस्टमध्ये, गीने स्पष्ट केले होते की हा व्हिडीओ Parenting Advice (पालकत्वाचा सल्ला) म्हणून किंवा इतरांनी त्याचे अनुकरण करावे यासाठी नव्हता. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते: "प्रत्येक मूल खूप वेगळे आहे, त्यामुळे आम्ही पालकत्व, शिस्त आणि CLIFF JUMP कसे करावे हे शिकवण्याची पद्धत वेगवेगळी ठेवतो. पहिलं प्राधान्य अर्थातच सुरक्षितता आहे. दुसरी गोष्ट तुम्ही कठीण गोष्टी करू शकता हे शिकणे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मजा करणे आहे."
टीका झाली तरी, गीवर या सार्वजनिक प्रतिक्रियेचा नकारात्मक परिणाम झाला नाही. तो म्हणाला, "मी आणि माझी पत्नी पालक म्हणून कोण आहोत, आमचे हेतू काय आहेत, आणि आम्ही किती काळजी घेणारे, सावध आणि प्रेमळ आहोत, याबद्दल मला खूप विश्वास आहे. याचा माझ्यावर परिणाम झाला नाही. इंटरनेटचे स्वरूप (nature) काय आहे, हे मला समजते." असे त्याने स्पष्ट केले.