मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या अस्वलाची हिंमत तर बघा..खतरनाक वाघाला गुडघे टेकायला लावले, थरकाप उडवणारा Video

रणथंभौर टायगर रिझर्व्हमध्ये पर्यटकांना शुक्रवारी संध्याकाळी असे एक वाइल्डलाइफ दृश्य पाहायला मिळाले,जे पाहून अनेकांचा थरकापच उडाला. वाघ आणि अस्वलाची आमने-सामने झालेली लढाई सर्वांचच लक्ष वेधून घेणारी ठरली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tiger vs Bear Video Viral

Tiger vs Bear Video : रणथंभौर टायगर रिझर्व्हमध्ये पर्यटकांना शुक्रवारी संध्याकाळी असे एक वाइल्डलाइफ दृश्य पाहायला मिळाले,जे पाहून अनेकांचा थरकापच उडाला. वाघ आणि अस्वलाची आमने-सामने झालेली लढाई सर्वांचच लक्ष वेधून घेणारी ठरली. सवाईमाधोपूर येथील रणथंभौर टायगर रिझर्व्हमध्ये एक अनोखं दृष्य पाहून पर्यटकांचाही थरकाप उडाला. झोन ३ आणि ४च्या सीमारेषेवर वाघीण रिद्धीचा नर बछडा अस्वलाशी भिडला.अस्वलाने त्याच्यासमोर असं काही केलं, जे पाहून या वाघाने आक्रमक भूमिकाच स्वीकारली. दोघांमध्ये शाब्दिक लढाईसारखे आवाज सुरु झाले आणि एकमेकांना झुंज देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. वाघ आणि अस्वलाच्या लढाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जंगलात नेमकं काय घडलं? 

हा व्हिडीओ पाहिल्यावर असं स्पष्ट होतं की, जंगलात प्राणीही आपापल्या मर्यादा आणि समजूतदारपणासह वागतात. ही घटना पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरली असून आता याचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. रणथंभौरमधील हे खास वाइल्डलाइफ दृश्य केवळ प्रेक्षकांच्या मनाला भिडले नाही,तर निसर्गाचं सौंदर्य आणि वन्यजीवनाची उदाहरण देतं. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात खळबळ! विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलीस येताच 'त्या' 5 तरुणी..

इथे पाहा वाघ आणि अस्वलाचा थरारक व्हिडीओ 

अस्वलाची हुंकार ऐकताच वाघाला कळलं की, आता आपला निभाव लागू शकणार नाही. त्याने हळूहळू गवतात बसत आत्मसमर्पण केले.

त्यामुळे एक संभाव्य भीषण संघर्ष थोडक्यात टळला. हे अद्भुत दृश्य पाहून पर्यटक अत्यंत रोमांचित झाले आणि त्यांनी हा क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.