तुम्ही एकता 'नागीण' (Naagin) हा टीव्ही शो पाहिला असेलच, ज्यात नायिका रात्री 12 वाजताच नागीण बनत असे. ही अगदी त्या डेली सोपसारखी घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले, तर कदाचित तुमचाही त्यावर विश्वास बसणार नाही. पण, यूपीच्या सीतापूरमध्ये गेल्या काही दिवसांत असाच एक अजब-गजब प्रकार घडला आहे. कारण येथील एक व्यक्ती अशीच तक्रार घेऊन जिल्हाधिकाऱ्याकडं गेली आहे. साधारणपणे लोकं लोक जिल्हाधिकाऱ्यांकडे वीज, रस्ते आणि रेशनसंबंधीच्या तक्रारी घेऊन जातात. पण, या व्यक्तीची तक्रार वेगळी आहे.
काय आहे प्रकरण?
येथील महमूदाबादच्या लोधासा गावचे मेराज आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. इतर लोकांपेक्षा मेराज यांचा हा प्रकार काहीसा 'अलौकिक' (Supernatural) निघाला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, 'साहेब, माझी बायको नसीमुन रात्री नागीण बनते... आणि मला चावण्यासाठी धावते.'
त्यांच्या या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण कार्यालयात काही क्षणांसाठी शांतता पसरली. जणू एखाद्या टीव्ही मालिकेतील दृश्य त्यांच्यासमोर आले आहे, असे त्यांना वाटले. मेराज यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांना अनेकदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येक वेळी त्यांची झोप उघडल्यामुळे तो हल्ला अपूर्ण राहतो.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
मेराज यांनी सांगितलं, 'पत्नी मला मानसिकरित्या त्रास देत आहे. माझी पत्नी कधीही झोपेत मला जीवे मारू शकते.' जिल्हाधिकाऱ्यांनी उप-विभागीय दंडाधिकारी (SDM) यांना आदेश दिले आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मेराज यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीने त्यांना एकदा चावा देखील घेतला आहे. नागिण बनून ती रात्री धावत येऊन त्यांना चावण्याचा प्रयत्न करते. यासंदर्भात पीडित मेराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जही दिला आहे.
ही बातमी गावात चांगलीच पसरली असून हे प्रकरण चर्चेचा विषय बनले. काही लोक याला काल्पनिक मानत आहेत, तर काहींनी हा प्रश्न मानसिक आरोग्याशी (Mental Health) संबंधित असल्याचं म्हंटलं आहे.