तुम्ही या बातमीच्या छायाचित्रामध्ये खुर्चीवर एक व्यक्ती बसलेला पाहात आहात.ते भाजप नेते आणि नौतनवाचे माजी नगराध्यक्ष गुड्डू खान आहेत. त्यांना छायाचित्रात दिसणाऱ्या महिला हात-पाय बांधून चिखल आणि घाणेरड्या पाण्याने आंघोळ घालत आहेत. भाजपा नेते त्याला कोणताही विरोध करत नाहीत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार काय आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. त्याचं कारण मोठं रंजक आहे. ते वाचून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कारण?
हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील आहे. गुड्डू खान हे तेथील महाराजगंज जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबतीत जो प्रकार घडला ती एक परंपरा आहे. या पंपरेनुसार जेव्हा पाऊस पडत नाही, तेव्हा परिसरातील एखाद्या प्रमुखाला किंवा प्रतिष्ठित व्यक्तीला चिखल आणि पाण्याने अंघोळ घातल्यास इंद्रदेव प्रसन्न होऊन पाऊस पाडतात.
याच परंपरेचे पालन करत, महाराजगंजच्या नौतनवाचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते गुड्डू खान यांना ही आंघोळ घालण्यात आली. खान यांनीही शांतपणे हसत-हसत या प्रथेमध्ये भाग घेतला.
( नक्की वाचा : Urine Eye Wash : स्वमुत्राने डोळे धुण्याचा नवा ट्रेंड! पुण्यातील महिलेचा मोठा दावा, अनुकरण करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला )
काय आहे परंपरा?
एकीकडे अनेक ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजला असताना, दुसरीकडे महाराजगंज जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सामान्य जनता उष्णतेने हैराण झाली आहे. त्यावेळी येथील ज्येष्ठ महिलांना जुनी परंपरा आठवली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी अशी प्रथा होती की, आपल्या नगर किंवा गावाच्या प्रमुखाला किंवा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीला चिखल आणि पाण्याने अंघोळ घातल्यास इंद्रदेव प्रसन्न होऊन पाऊस पाडतात.
हीच प्रथा खरी मानून नौतनवा नगरपालिका भागातील महिला कजरी गीत गात भाजप नेते आणि नौतनवा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष गुड्डू खान यांच्या घरी पोहोचल्या. त्यांनी माजी नगराध्यक्षांचे हात-पाय बांधले. त्यांना जमिनीवर झोपवून चिखल आणि पाण्याने अंघोळ घातली.
व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, कशाप्रकारे महिला कजरी गीत गात आहेत आणि माजी नगराध्यक्षांना बांधून त्यांना चिखलाने अंघोळ घालत आहेत. भाजप नेते गुड्डू खान आनंदाने पावसासाठी अंघोळ करत आहेत. जुन्या परंपरेत गावातील लोक पाऊस न पडल्यास राजे-महाराजांना कजरी गीत गाऊन अंघोळ घालत असत, ज्यामुळे इंद्रदेव प्रसन्न होऊन पाऊस पाडत असत. हेच पाहून महिलांनी त्यांना चिखलाने अंघोळ घातली आहे, असे खान यांनी सांगितले.