Hershey's सिरपमध्ये सापडला उंदीर, कंपनी म्हणते....

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईमधल्या एका डॉक्टरला आईस्क्रीमच्या कोनामध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. या घटनेने अन्न सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण  झाले आहेत. ही घटना ताजी असताना प्रामी श्रीधर यांनी त्यांच्यासोबत झालेल्या घटनेबाबत इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी झेप्टोद्वारे 'हर्शे'कंपनीचे चॉकलेट सिरप मागवले होते. हे सिरप खाल्ल्यानंतर त्यांच्या घरातील तिघांना उपचार घ्यावे लागले. कारण या सिरपमध्ये मेलेला उंदीर होता आणि त्यामुळे हे सिरप दुषित झाले होते. 

हा प्रकार गेल्या महिन्यात झाल्याचे प्रामी यांनी लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात ब्राऊनी केकची लज्जत वाढवण्यासाठी 'हर्शे'चं चॉकलेट सिरप मागवलं होतं. हे सिरप ओतल्यानंतर त्यात केस सापडले होते. यामुळे संशय आल्याने प्रामी यांनी  सिरपची बाटली एका कपमध्ये रिकामी केली. यावेळी त्यांना सिरपमध्ये मेलेला उंदीर दिसला. व्हिडीओमध्ये प्रामी यांच्या घरच्यांनी सिरपमध्ये नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी पाण्याखाली नीट धुतल्यानंतर उंदीर व्यवस्थित दिसत आहे.

प्रामी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, " आपण काय खातोय हे नीट तपासून घ्या. अन्न मुलांना देताना ते नीट पाहा. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक बाब असून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करणारीही बाब आहे. या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि असे पुन्हा घडणार नाही याची हमी देखील हवी आहे.  "   

Advertisement

'हर्शे' कंपनीने या व्हिडीओची दखल घेतली असून कंपनीने उत्तरात म्हटले आहे की,  consumercare@hersheys.com या ईमेल आयडीवर बॉटलवरील UPC आणि उत्पादन कोड पाठवा. तुमचा संदर्भ क्रमांक  11082163 असून आमचे प्रतिनिधी तुम्हाला सहाय्य करतील. 

ट्रेंडिंग बातमी - ओम खड्डे देवाय नम:, खड्डा मोठा पडू दे नम: ; पंढरपुरात तरुणाने खड्ड्यांसमोर मांडली पूजा, Video व्हायरल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सदर प्रकरणात चूक कोणाची आहे हे कळणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. एका व्यक्तीने लिहिले आहे की अशी उत्पादने सीलबंद स्वरुपात ग्राहकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे ही समस्या उत्पादनाच्या वेळची असून ही समस्या डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीमुळे निर्माण झालेली नाही. झेप्टोवर टीका करण्याऐवजी सदर प्रकरणी ग्राहक न्यायालयात दाद मागा. अन्य एका व्यक्तीने म्हटलंय की हा एक प्रकार उघडकीस आला आहे. विचार करा दुषित उंदरामुळे किती बॉटलमध्ये विषाणू गेले असतील.