Viral Video: ते दरोडा टाकत होते, लोक Video बनवत होते! सशस्त्र दरोड्याचा LIVE व्हिडीओने खळबळ, कुठे घडलं?

लक्ष्मी ज्वेलर्स दुकानात असलेल्या कर्मचाऱ्यांना या दरोडेखोरांनी धमकावले. दोन दरोडेखोर हे दुकानात घुसले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
डहाणू:

मनोज सातवी 

सध्या एक व्हिडीओने सोशल मीडियावरमध्ये धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ लाईव्ह दरोड्याचा आहे. भर दिवसा घातलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्यावेळी हा दरोड टाकला जात होता त्यावेळी काही जण याचा व्हिडीओ ही बनवत होते. त्यांच्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार घडत होता. त्यावेळी परिसरात भितीचे वातावरण होते. दरोडेखोराच्या हाता शस्त्र होती. त्यामुळे कुणी ही काहीच हालचाल करू शकले नाहीत. ही घटना डहाणूत घडली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहात नाही. 

ही थरारक घटना डहाणूच्या इराणी नगर परिसरात घडली आहे. भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडली होती. हातात शस्त्रे घेऊन तिन दरोडेखोर या परिसरात आले होते. इराणीनगर मध्ये लक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. या परिसरातील हे परिचित आणि मोठे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यामुळे दरोडेखोरांनी याच दुकानाला लक्ष्य केले. ते शस्त्र घेवून थेट दुकानात घुसले. त्यांच्या हातात बंदुका होता. त्यामुळे दुकानात असलेले लोक ही घाबरून गेले होते. त्यांच्या समोर काही पर्याय राहीला नव्हता. 

Advertisement

नक्की वाचा - Monsoon Session: लोकसभा 5 वेळा तहकूब! पेपर लिक प्रकरण अन् धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमान्यावर विरोधक आक्रमक

लक्ष्मी ज्वेलर्स दुकानात असलेल्या कर्मचाऱ्यांना या दरोडेखोरांनी धमकावले. दोन दरोडेखोर हे दुकानात घुसले होते. तर एक दरोडेखोर दुकानाबाहेर उभा राहून रेकी करत होता. आत गेलेल्या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. सोन्या चांदीचे दागिने घेवून ते क्षणार्धात पसार झाले. त्यानंतर एकच धावपळ उडाली. डोळ्या देखत संपूर्ण दुकान लुटले गेले होते. पण त्यावेळी कोणी ही या ज्वेलर्सच्या मदतीसाठी धावले नाही. त्याला कारण ही तसेच होते. दरोडेखोरांकडे खतरनाक अशी शस्त्र होती. तिथे असलेल्या लोकांनी हा लाईव्ह दरोडा पाहीला.

नक्की वाचा - Pune News: 'आप'च्या आंदोलनात हुल्लडबाजी! NDTV मराठीच्या प्रतिनिधीची गाडी फोडली

भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे डहाणूसह परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण घटना दुकानाच्या समोरील एका व्यक्तीने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे. या दरोड्याची माहिती मिळताच डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या आधारे ते आता या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. डहाणूतला हा सर्वात सुरक्षित भाग आणि गजबजलेला परिसर आहे. तरी ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने दरोडा पडतो यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. 


Topics mentioned in this article