Video : काढ... दाखव मला...! तरुणी भडकली, चोपत सुटली

या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आले असून जवळपास साडेसहा हजार जणांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. Incognito नावाच्या X हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आले असून जवळपास साडेसहा हजार जणांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी रस्त्यावर छपरी चाळे करणाऱ्या एका व्यक्तीला खडसावताना दिसते आहे.  दाढी वाढवलेल्या अवस्थेतील चांगला टीशर्ट आणि ट्रॅक पँट घातलेल्या या व्यक्तीला तरुणीने चांगलेच चोपले. 

या तरुणीने या तरुणाला चोपताना म्हटले की, 'दाखव मला काय दाखवत होतास ते, काढ , उतरव कपडे. फार हौस आहे ना तुला दाखवण्याची. आता तुला लाज वाटतेय ?XXXडीच्या, लाज वाटतेय आता ? दाखव मला. दाखव (झापडीत मारत)दाखव मला.'

ज्या तरूणाला ही तरुणी चोपताना दिसते आहे त्याने या तरुणीकडे पाहून अश्लील चाळे केले होते. ऐरवी तरुणी असले प्रकार पाहून घाबरतात आणि पळ काढतात. मात्र या तरुणीने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तिने रौद्रावतार धारण केला आणि या तरुणाला पकडले. तिच्यासोबत एक मित्रही होता त्याने सगळी घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला चोपून काढत या तरुणीने त्याला चांगला धडा शिकवला. या व्हिडीओवर X वापरणाऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Topics mentioned in this article